14 December 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या
x

पण राज्यात महाविकास आघाडीची शिवभोजन योजना सुरु आहे....मग

Corona Crisis, Covid19, MLA Nitesh Rane, Shiv Bhojan, Sharad Bhojan

मुंबई, १३ एप्रिल: राज्यात दर दिवशी जवळपास ७००-८०० च्या घरात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता उद्या संपणारा केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढविण्याची वेळ राज्य सरकारवर आलेली आहे. राज्यात मुंबई-पुणे सर्वाधिक बाधित असले तरीही उपराजधानी नागपूरमध्येही रुग्णांचा आकडा ४९ वर गेलेला आहे. यामुळे राज्यात उद्यापासून पुढील दोन आठवडे म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान या लॉकडाउन’मध्ये गरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर जेवणाचे हाल झाले आहेत. त्यानिमित्त महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन योजना मोठ्याप्रमाणावर कार्यान्वित केली आहे.

तर कोरोनाबाधीत क्षेत्रांना अन्न धान्याचा तुटवडा भासू देणार नाही, अशा शब्दांत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी करोनाच्या छायेखाली सील झालेल्या वस्त्यांना आश्वस्त केले आहे. या पार्श्वभूमीवर गरीबांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलली आहेत. दरम्यान, भाजपाचे नेते आमदार निलेश राणे यांनी शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष करून महाविकास आघाडीवरून खोचक टोला लगावला आहे.

पुणे जिल्हा परिषदेनं करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शरज भोजन योजने’ची सुरूवात केली आहे. निराधार दिव्यांग, वृद्ध नागरिक आणि निराधार दुर्धर आजारग्रस्तांसाठी ही योजना असल्याचं सांगण्यात आलं आहे. याअंतर्गत त्यांना दोन वेळचं जेवण पुरवलं जाणार आहे. तसंच गरजू लोकांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाद्वारे करण्यात आलं आहे. यावरून आता नितेश राणे यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात राणे यांनी एक ट्विट केलं आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी यासंदर्भातील एक फोटो शेअर केला आहे तसंच त्याला छान… पण… असं कॅप्शनही दिलं आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी पण…राज्यात महाविकास आघाडीची शिव भोजन योजना सगळी कडे सुरु आहे..मग..जनतेत संभ्रम नको म्हणून विचारल.. असं म्हणत महाविकास आघाडीला टोला हाणला आहे.

 

News English Summary: The Pune Zilla Parishad has launched ‘Shaaraj Meal Yojana’ in the backdrop of Korona. It is said to be a scheme for the destitute, the elderly and the destitute. Under this, they will be provided with two meals. Also, the District Welfare Department’s Social Welfare Department appealed to the people to reach out to the scheme. From now on, Nitesh Rane has criticized.

News English Title: Story BJP MLS Nitesh Rane criticize Mahavikas Aghadi NCP over Shiv Bhojan Sharad Bhojan Corona virus lockdown Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x