14 December 2024 9:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

शिंदे गटातील मंत्र्यांकडून आंबेडकरी चळवळीतील महिला नेत्याचा अपमान तर आदीवासी कोळी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

Minister Gulabrao Patil

Sushma Andhare | शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी आंबेडकरी चळवळीतील महिला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवरील अपमानजनक उल्लेख केला आहे. सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटलांच्या भागात जाऊन त्यांना खुलं आव्हान दिलं होतं. यानंतर गुलाबराव पाटील राजकीय दृष्ट्या बिथरल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान टीका करताना मंत्री गुलाबराव पाटलांची जीभ घसरली आहे.

ठाकरेंना त्यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. सुषमा अंधारे यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी लाडू दिला आहे, म्हणून त्या फिरत आहे. मला माझा जिल्हा ओळखतो. त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही म्हणून त्यांना नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे असते, त्याप्रमाणे यांनी आता आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. असा खालच्या भाषेतील अपमानजनक हल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे तसेच आंबेडकरी चळवळीतील महिला नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केला.

सुषमा अंधारे यांना भाषण करण्याची परवानगी नाकारल्यानंतर:
तीन महिन्यांच्या बाळाला अडवण्यासाठी 500 पोलीस का लागले, असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथे सुषमा अंधारे यांना भाषण करण्याची परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी ही शिंदे सरकार आणि विशेषतः जळगावमधील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात टीका केली आहे. दुसरीकडे आदिवासी कोळी समाजाचे नेते शरद कोळी यांचा आवाज देखील दाबण्याचा प्रयत्न केला जातोय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Minister Gulabrao Patil controversial statement against Sushma Andhare check details 06 November 2022.

हॅशटॅग्स

#Minister Gulabrao Patil(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x