14 November 2019 1:11 PM
अँप डाउनलोड

भाऊ आला धावून; ४६२ कोटींचे कर्ज फेडल्यामुळे अनिल अंबानींची तुरुंगवारी वाचली

Mukesh Ambani, Anil Ambani

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आपल्या लहान भावाला मोठ्या संकटातून वाचवले आहे. एरिक्सन या कंपनीला देण्यासाठी पैसे नसल्याने अनिल अंबानी यांना तुरुंगवास भोगावा लागणार होता. मात्र मुकेश अंबानी यांनी अनिल यांच्यावरील ४६२ कोटींचे कर्ज फेडल्यामुळे त्यांच्यावरील अटकेचे संकट आता टळले आहे. या कठीण प्रसंगात साथ दिल्याने अनिल अंबानी यांनी भाऊ मुकेश अंबानी आणि वाहिनी नीता अंबानी यांचे आभार मानले आहेत.

स्वीडनच्या एरिक्सन या कंपनीचे पैसे न दिल्यामुळे अनिल अंबानींच्या आरकॉमविरोधात सर्वोच्च न्यायालयाने धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने पैसे देण्यासाठी कालावधी ठरवून दिला होता. अखेर या तारखेच्या आतच अनिल अंबानी यांनी मोठ्या भावाच्या मदतीने एरिक्सनला ४६२ कोटी रुपये दिले. दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने आरकॉमच्या वायरलेस एसेटची तीन हजार कोटी रुपयांना खरेदी केली होती. यामुळे कर्जातून सावरण्यास अनिल अंबानींच्या कंपनीला मोठा आधार मिळाला होता. म्हणून रिलायन्सची विभागणी झाल्यानंतर मुकेश अंबानी यांनी भावाच्या मदतीला धावून येण्याची ही दुसरी वेळ आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1036)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या