7 October 2022 6:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 08 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Penny Stocks | या 18 रुपयाच्या शेअरने 170 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला, ता 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक नेम नोट करा Dry Brushing  | डेड स्किन काढून त्वचा बनवा चमकदार, घरीच करा ड्राय ब्रशिंग, या टिप्स फॉलो करा शिंदेंची सभा फ्लॉप तर शिवाजीपार्कची सभा गाजल्याचे माध्यमांवर दिसल्याने भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचा जळफळाट?, भावनिक टिपण्या सुरु Mutual Funds | टॉप 10 म्युच्युअल फंड योजना ज्या गुंतवणूकदारांचा पैसा वेगाने वाढवत आहेत, त्या फंडाच्या योजना आणि यादी सेव्ह करा Penny Stocks | गुंतवणूकदारांसाठी लाईफ चेंजर ठरला हा 2 रुपयाचा शेअर, 1 लाखावर तब्बल 7 कोटी परतावा, स्टॉकबद्दल जाणून घ्या LIC Credit Card | तुमची एलआयसी पॉलिसी आहे?, घरबसल्या मिळेल फ्री LIC क्रेडिट कार्ड, अनेक फायदे मिळणार
x

बिहार | बेरोजगारी, महागाई, अर्थव्यवस्था मुद्दे मोदींचा भाषणातून गायब

Bihar Assembly Election 2020, PM Narendra Modi

सासाराम, २३ ऑक्टोबर: पंतप्रधान मोदी यांची आज बिहार निवडणुकीसाठी पहिली सभा होत आहे. पंतप्रधान मोदी यांची पहिली रॅली आज सासाराम येथे झाली. या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासह महाआघाडीवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० वरून विरोधकांवर हल्लाबोल केला.

यावेळी पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला. पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर विरोधकांना लक्ष्य केलं. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 एनडीए सरकारने हटवलं. पण विरोधकांना या निर्णय उलटवायचा आहे. अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे. पीएम नरेंद्र मोदींनी म्हटलं की, ‘आमच्या सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. पण आता हे लोकं याला उलटवण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधक म्हणतायंत की, सत्तेत आल्यानंतर ते पुन्हा कलम 370 लागू करतील. यांनी कोणाचीही मदत घेतली तरी देश मागे हटणार नाही.’

गलवान खोऱ्यात बिहारचे जवान शहीद झाले. मात्र त्यांनी भारतमातेची मान झुकू दिली नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही बिहारच्या जवानांनी बलिदान दिलं. त्यांनी मी शतश: वंदन करतो, असं मोदी पुढे म्हणाले. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. केंद्रात काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असताना बिहार मागे पडला . बिहारची १० वर्षे वाया गेली, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

सध्या देशात बेरोजगारीने उच्चांक गाठले आहेत आणि अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. मात्र मोदींनी लोकसभा निवडणुकीतील भाषणाचे तंत्र कायम ठेवलं असून त्यात देशातील सामान्य लोकांशी निगडित असलेल्या कोणत्याही विषयाला हात न घालता केवळ भावनिक मुद्दे पुढे केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्वतः मोदीच्या भाषणात या मुद्यांना स्थान नसणे म्हणजे केंद्र सरकार याविषयात नापास झाल्याचा अप्रत्यक्ष पुरावाच म्हणावा लागेल.

 

News English Summary: Unemployment has peaked in the country and the economy is in dire straits. However, Modi has maintained his rhetoric in the Lok Sabha elections, in which he has raised only emotional issues without touching on any issue related to the common people of the country. Therefore, the fact that these issues do not have a place in Modi’s speech itself is an indirect proof that the central government has failed in this regard.

News English Title: Bihar Assembly Election 2020 PM Narendra Modi speech topics News Updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x