25 April 2024 10:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

जिथं जातात, तिथं खोटं बोलतात | राहुल गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

Bihar Assembly Election 2020, Congress leader Rahul Gandhi, PM Narendra Modi

हिसुआ, २३ ऑक्टोबर: पंतप्रधान मोदी यांची आज बिहार निवडणुकीसाठी पहिली सभा होत आहे. पंतप्रधान मोदी यांची पहिली रॅली आज सासाराम येथे झाली. या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासह महाआघाडीवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० वरून विरोधकांवर हल्लाबोल केला.

यावेळी पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला. पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर विरोधकांना लक्ष्य केलं. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 एनडीए सरकारने हटवलं. पण विरोधकांना या निर्णय उलटवायचा आहे. अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे.

गलवान खोऱ्यात बिहारचे जवान शहीद झाले. मात्र त्यांनी भारतमातेची मान झुकू दिली नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही बिहारच्या जवानांनी बलिदान दिलं. त्यांनी मी शतश: वंदन करतो, असं मोदी पुढे म्हणाले. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. केंद्रात काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असताना बिहार मागे पडला . बिहारची १० वर्षे वाया गेली, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

दरम्यान, पंतप्रधानांनी महाआघाडीवर टीकास्त्र डागल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रचाराच्या मैदानातून मोदींवर पलटवार केला. राहुल गांधी यांनी चीन सीमावाद व रोजगाराच्या मुद्यावरून मोदींना सवाल करत बिहारच्या जनतेला सत्तांतराचं आवाहन केलं.

राहुल गांधी व तेजस्वी यादव यांची संयुक्त बदलाव संकल्प रॅली नवादा जिल्ह्यातील हिसुआमध्ये झाली. या रॅलीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर खोटं बोलत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी म्हणाले,”बिहारमधील जे सैनिक शहीद झाले, त्यांच्यासमोर पंतप्रधान नतमस्तक होत आहेत. संपूर्ण देश शहिदांसमोर नतमस्तक होतोय. प्रश्न नतमस्तक होण्याचा नाही. जेव्हा बिहारमधील जवान शहीद झाले, त्या दिवशी पंतप्रधान काय म्हणाले, हा प्रश्न आहे. लडाखमध्ये देशाची सीमा आहे. त्या सीमेवर बिहार, उत्तर प्रदेश व इतर राज्यातील तरुण देशाचं संरक्षण करतात. उपाशी राहतात, पण परत येत नाहीत,” असं राहुल गांधी म्हणाले.

“प्रश्न हा आहे की, चीनच्या जवानांनी आपल्याला जवानांना शहीद करून १२०० किमी जमीन चीननं घेतली. चिनी सैन्य भारतात आहे. चीन भारतीय हद्दीत घुसले होते, तेव्हा मोदी असं का म्हणाले होते की, भारतात कुणीही घुसखोरी केली नाही. आज म्हणतात नतमस्तक होतो. पण, खोटं बोलून त्यांनी शहिदांचा अपमान केला. आता प्रश्न आहे की, चीनला परत कधी हद्दपार करणार. आणि येथे येऊन काहीही खोटं बोलू नका. बिहारींना खोटं बोलू नका. तुम्ही सांगा किती बिहारींना रोजगार दिली. मागील निवडणुकीत म्हणाले होते २ कोटी तरुणांना रोजगार देणार. कुणाला मिळाला का? येतात आणि म्हणतात, शेतकरी, जवान आणि मजुरांच्या समोर मी नतमस्तक होतो. घरी गेल्यावर अंबानी व अदानीचं काम करतात.

 

News English Summary: The joint change resolution rally of Rahul Gandhi and Tejaswi Yadav took place in Hisua in Nawada district. At the rally, Rahul Gandhi accused Prime Minister Modi of lying. Rahul Gandhi said that the Prime Minister is bowing before the soldiers who were martyred in Bihar. The whole country is bowing before the martyrs. The question is not to bow down.

News English Title: Bihar Assembly Election 2020 Congress leader Rahul Gandhi criticized PM Narendra Modi News updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x