मुंबई : कालच्या रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनावरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मोदीसरकारवर जोरदार टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी असो किंव्हा मेहुल चोक्सीसारखे लोक देशाला लुटून पळून जातात आहेत आणि स्थानिक भूमिपुत्र मात्र रोजगारासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहेत.

मुंबईच्या रेल्वे रुळावर उतरून आंदोलन करणारी मुले ही गरीब कुटुंबातील आहेत, परंतु भाजप सरकार केवळ बुलेट ट्रेन आणि हाय स्पीड ट्रेन सारख्या श्रीमंतांच्याच घोषणा देण्यात मग्न आहे.

एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर एल्फिन्स्टनचा पूल जसा लष्कराने बांधला तसा या मुलांचे प्रश्न सुद्धा लष्करचं सोडवणार आहे आणि तुम्ही सगळे केवळ आढ्यास तंगड्या लावून बसणार अशी कोणती योजना आहे काय ? असा प्रतिप्रश्न करून खोचक टोला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारला लगावला आहे.

Uddhav Thackeray lashes out on bjp government over mumbai rail roko