6 December 2024 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये आला, रॉकेट तेजीचे संकेत, सकारात्मक बातमी आली - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER EDLI Scheme | पगारदारांना सुखद धक्का; EDLI योजना 3 वर्षांनी वाढली, लाभ घेणे आणखीन झाले सोपे, वाचा सविस्तर - Marathi News HDFC Mutual Fund | 1 लाख रुपयांची गुंतवणूक बनवेल 39 लाखांचा फंड; ही म्युच्युअल फंड योजना पैशाचा पाऊस पाडेल Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा रॉकेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत - NSE: SUZLON Electricity Bill | विज बिलावर सरकारकडून 100% सबसिडी; काय आहे विज बिलमाफी 2025 योजना, सविस्तर जाणून घ्या
x

कंगनाच्या ऑफिसवरची कारवाई योग्यच | BMCचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

Bollywood, Kangana Ranaut,  BMC to Mumbai high court, Marathi News ABP Maza

मुंबई, १९ सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रानौत हिने आपले ऑफिस बांधकाम करताना अनधिकृतपणे बदल केला. त्यामुळे मुंबई पालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. कंगनाच्या ऑफिसवरची कारवाई योग्यच होती, असे प्रतित्रापत्र मुंबई उच्च न्यायालयात मुंबई महापालिकेने दाखल केले आहे. कंगनाच्या मालमत्तेत १४ निहमबाह्य बदल करण्यात आले होते. त्यामुळे केलेली कारवाई योग्यच असल्याची ठाम भूमिका मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे. आता उच्च न्यायालय काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे.

मुंबई महानगर पालिकेने खारमधील पाली हिल येथील अभिनेत्री कंगना रानौतच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर कंगनाकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती. यासाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेला उत्तर देताना बीएमसीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यात पालिकेची कारवाई योग्यच असल्याचे म्हणण्यात आले आहे. खोटे दावे करत याचिका दाखल केल्याबद्दल कंगनावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. कंगनाच्या मालमत्तेत १४ निहमबाह्य बदल करण्यात आले होते. त्यामुळे केलेली कारवाई योग्यच असल्याची ठाम भूमिका मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली.

कंगना रनौत (Kangana Ranaut) 9 सप्टेंबरला मुंबईत येणार होती त्याच दिवशी सकाळी तिच्या वांंद्रे (Bandra) येथील कार्यालयात BMC कडुन सकाळी तोडफोड करण्यात आली. कंंगनाने या तुटलेल्या ऑफिसचे काही व्हिडिओ आपल्या ट्विटरवरुन शेअर केले होते. या व्हिडिओमध्ये ऑफिसची पुर्णपणे वाताहात झाल्याचे दिसुन येत आहे. हा लोकशाहीचा मृत्यु आहे असे म्हणत कंंगनाने #DeathOfDemocracy अशा हॅशटॅग सह हे व्हिडिओ शेअर केले होते.

 

News English Summary: Actress Kangana Ranaut made unofficial changes while constructing her office. Therefore, action was taken on behalf of Mumbai Municipal Corporation. The Mumbai Municipal Corporation has filed a reply in the Mumbai High Court stating that the action taken against Kangana’s office was justified. Kangana’s property had undergone 14 out-of-pocket changes.

News English Title: Kangana Ranaut has not claimed structure legal BMC to Mumbai high court on demolition Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x