मुंबईत १६२ खासगी इंग्रजी शाळा बेकायदा | ऍडमिशन पूर्वी माहिती घ्या
मुंबई, ५ जानेवारी: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील २०६ बेकायदा शाळांची यादी नुकतीच जाहीर केली. इंग्रजी माध्यमाच्या सर्वाधिक १६२ बेकायदा शाळा असल्याचे उघडकीस आले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड सुरू असते. त्यामुळे पालकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. बेकायदा शाळा तातडीने बंद करा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी सूचना पालिकेने शाळा प्रशासनाला दिली आहे.
त्यामुळे या शाळांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी योग्य ती कागदपत्रे तपासा, असे आवाहन पालिकेने केले आहे. यातील बहुतांश शाळा या पूर्व आणि उत्तर मुंबईतील आहेत. ६७ शाळा एम वॉर्ड म्हणजे मानखुर्द, गोवंडी परिसरातील आहेत. तर उर्वरित शाळा या मालाड, मालवणी, घाटकोपर आणि भांडुप परिसरातील आहेत. या शाळा बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. यामुळे पालकांनी अशा शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेची मान्यता बंधनकारक आहे. ही मान्यता न घेताच अनेक संस्थाचालकांनी झोपडपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणात शाळा सुरू केल्या आहेत. सरकारी नियम धाब्यावर बसविणार्या शाळा व्यवस्थापनावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. अनधिकृत शाळा व्यवस्थापनांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळील महापालिकेच्या किंवा मान्यताप्राप्त खासगी शाळेत पुढील शिक्षणासाठी दाखल करावे, अशा सूचना शिक्षणाधिकार्यांनी दिल्या आहेत.
माध्यमनिहाय शाळा:
- इंग्रजी – १६२
- उर्दू – १६
- हिंदी – १५
- मराठी – १३
News English Summary: The Mumbai Municipal Corporation’s education department recently released a list of 206 illegal schools in the city. The highest number of 162 illegal English medium schools has been revealed. Parents struggle to get students admitted to English medium schools. So parents are more likely to be deceived. The municipality has instructed the school administration to close the illegal schools immediately or else punitive action will be taken.
News English Title: BMC declared 206 illegal schools in the Mumbai city news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या