17 November 2019 9:50 PM
अँप डाउनलोड

मुंबई ठाण्यात कालपासून जोरदार पाऊस ; वाहतुकीवर परिणाम

मुंबई : काल पासून बरसणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता. मुंबई व उपनगरात जोरदार पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईसह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये मुसळधार पावसाने काल रात्रीपासून धुमशान घातलं आहे.

हवामान खात्याने सुद्धा येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साठल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासात हाल होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांनी खूप महत्वाचे काम असल्यास बाहेर पडावे असं आवाहन करण्यात येत आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या