19 July 2024 3:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | आता नाही थांबणार! अशोक लेलँड शेअर मजबूत परतावा देणार, फायद्याची अपडेट आली Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग सह या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी IFL Enterprises Share Price | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये मालामाल करतोय शेअर Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Rites Share Price | पटापट खरेदी करा हा मल्टिबॅगर शेअर, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, पुन्हा तेजी येणार IREDA Share Price | PSU शेअरने भरपूर कमाई झाली, आता सावध होण्याचा सल्ला, किती घसरणार स्टॉक प्राईस? KPI Green Energy Share Price | मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदीची संधी, यापूर्वी 5 पटीने वाढवला पैसा
x

Viral Video | अर्रर्रर्र!! गायीला वाचवायला नाल्यात उतरला आणि पुढे काय झाल ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही  

Viral Video

Viral Video | प्रत्येक मुका प्राणी हा निष्पाप असतो. त्यामुळे कोणताही प्राणी संकटात दिसला की, अनेक जण त्याच्या मदतीसाठी धावून येतात. यात गाय म्हणजे साक्षात ३३ कोटी देव असे हिंदू धर्मात मानले जाते त्यामुळे सर्वजण तिची पुजा आणि सेवा करतात. आशात सोशल मीडियावर एका गायीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक गाय मोठ्या नाल्यात पडलेली दिसते.

ती वरती येण्याचा खुप प्रयत्न करते मात्र नाला खोल असल्याने तिला वरती येता येत नाही. त्यामुळे तेथून जाणा-या अनेक व्यक्तींच्या हे लक्षात येतं आणि ते गायीची मदत करतात. खुप मेहनतीने ते गायीला नाल्यातून बाहेर काढतात. यातील काही व्यक्ती तर स्वत: देखील नाल्यात उतरुण गायीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात.

बराचवेळ प्रयत्न करुण अखेर ते गायीला सुखरुप बाहेर काढतात. तेथील लोकांनी गायीला केलेल्या मदतीचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर सगळिकडे पसरला आहे. अनेक व्यक्ती गायी मदत करणा-यांचे आभार मानत आहेत. अशात हा व्हिडीओ लोकांनी दाखवलेल्या सहानुभूती बरोबरच आणखीन एका कारणासाठी चर्चेत आला आहे.

या व्हिडीओत गायीला बाहेर काढण्यासाठी एक व्यक्तीच आधीच नाल्यात उतरलेला दिसत आहे. मात्र त्याची मदत करण्यासाठी आणखीन भक्कम आणि थोडा लठ्ठ माणून नाल्यात उतरतो. त्याच्यामुळे गाय पटकन वर येते खरी मात्र तो माणूस तेथेच अडकतो. त्यामुळे बाकिच्या व्यक्ती त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न करु लागतात. काही जण त्याचे हात धरून त्याला वर खेचतात. तर आधीच नाल्यात असलेला दुसरा माणूस त्याला बाहेर काढण्यासाठी मागून जोर देत असतो.

मात्र त्या माणसाला बाहेर येता येत नसते. भरपूर प्रयत्न करुण नंतर त्यालाही बाहेर काढले जाते. हा व्हिडीओ इंस्टाग्राम वरील Videolucu.funny  या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आता या व्हिडीओवर अनेक जण गायीचा जीव वाचवणा-यांचे कौतुक करत आहेत. तर काही व्यक्ती यातील शेवटचा फनी सिन पाहून हसत आहेत. मात्र तसे असले तरी ती व्यक्ती देखील गायीसाठी नाल्यात उतरली होती त्यामुळे काहींनी त्याच्या विषयी चिंता व्यक्त केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Viral Video He got into the stream to save the cow and what happens next will make you laugh 27 March 2023.

हॅशटॅग्स

#Viral Video(161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x