19 April 2024 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

भाजपा स्वतःच्या फायद्यासाठी देशात दंगली घडवू शकतं: युपी मंत्री ओमप्रकाश राजभर

लखनौ : भारतीय जनता पक्षाचे योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री तसेच मित्रपक्ष सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांच्या एका वक्तव्याने खळबळ माजली आहे. दरम्यान त्यांनी केलेल्या दाव्यामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत आला आहे.

ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका करताना आरोप केला आहे की, भारतीय जनता पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी देशभरात दंगली घडवू शकतं आणि २१ फेब्रुवारीला राम मंदिराच्या नावे लोकांना भडकावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. भारतीय जनता पक्ष सध्या देशात निवडणुका जिंकण्यासाठी दंगली घडवण्याच्या मूडमध्ये आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे लोक मतं मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात’. दरम्यान, राजभर यांनी भाषणावेळी उपस्थित हिंदू आणि मुस्लिमांना एकजूट राखण्याचं जाहीर आवाहन सुद्धा केलं आहे.

याआधी राजभर यांनी कोणत्याही जातीय दंगलीत केवळ सामान्य लोकांचाच मृत्यू का होतो ? त्यात राजकीय नेते का नसतात? तसेच ‘हिंदू मुस्लिम दंगलीत एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचा कधी मृत्यू झाला का? असा प्रश्न विचारला होता. केवळ धर्माच्या आधारे भांडणं लावत फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय नेत्यांना आधी जिवंत जाळलं पाहिजे. यानंतरच त्यांना गांभीर्य कळेल आणि इतरांना ‘जाळणं’ बंद करतील’, असं ओमप्रकाश राजभर यांनी म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी अमेरिकेची गुप्तचर एजन्सी सीआयए’ने सुद्धा त्यांच्या अहवालात याचा उल्लेख करत, भाजपचा हिंदू कट्टरवाद भारतात निवडणुकीआधी मोठी जातीय दंगल घडवू शकत असं म्हटलं होत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x