नवी दिल्ली : आणीबाणीत देशातील लोकशाही हिरावली. नागरिकांचे हक्क घेण्यात आल्याचा पुनोच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते ‘मन की बात’ बोलत आहेत. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये मोठा विजय मिळाल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. नव्याने पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच ‘मन की बात’ कार्यक्रम आहे.
‘मन की बात’मध्ये जी पत्र येतात त्यामध्ये जनता अडचणींचे वर्णन करते. या वर्णनातून अडचणींवर मार्ग काढणे समाजव्यापी कसे असू शकते हे समजते, असंही मोदी म्हणाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीदरम्यान केदारनाथला का गेलात? या प्रश्नावर मोदींनी उत्तर दिलं. मोदींनी केदारनाथला जाऊन स्वत:शी संवाद साधला असल्याचं सांगितलं.
वास्तविक देशातील तरुणाशी संवाद साधताना मोदींना मुळात तरुणांचे मूळ प्रश्न समजतात का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. या मन की बात वेळी प्रश्न विचाराने सुद्धा पक्षाकडून आधीच मॅनेज केलेले असतात हा अनुभव सहज हजेरी लावल्यास लक्षात येतो. भाजप त्यांच्या प्रत्येक कार्यालयात चाय आणि भजीची सोय करतात जेणे करून उपस्थित राहणाऱ्या लोकांना रोखून धरता येईल आणि यामध्ये पक्षाचे स्थानिक कार्यकर्तेच हजर असतात. सामान्य लोकं स्वतःचा सुट्टीचा दिवस वाया घालवून हजेरी लावत नाहीत हे देखील धान्यात येते. मात्र प्रसार माध्यमांकडे सामान्य माणसांनी मोदींना चर्चेवेळी कोणते प्रश्न विचारले आणि मोदींनी काय उत्तर दिले, या बातम्या मात्र भाजपचा मीडिया सेल पद्धतशीर प्रसार माध्यमांकडे पोहोचवतो.
अनेक ठिकाणी हे देखील आढळते आहे की, स्थानिक कार्यकर्ते देखील केवळ फुकट चाय आणि भजी खायला मिळते म्हणून हजर राहतात आणि मोदींचा संवाद सुरु असताना त्याकडे कोणाचेही कान नसतात. मात्र मोदी ब्रँड अवेरन्स करून, बघा देशाचा पंतप्रधान सामान्यांशी कसा संवाद साधतो अशी हवा या कार्यकर्त्यांच्या डोक्यात भरली जाते आहे. देशभर बेरोजगार तरुण-तरुणीच्या फौजा तयार होत असताना मोदी मात्र त्यांच्याशी ४४ वर्षांपूर्वीच्या आणीबाणीच्या चर्चा करण्यात धन्यता मानत आहेत. बेरोजगारीवर कोणीही यावेळी मोदींना प्रश्न विचारात नाहीत कारण, प्रश्न विचारणारे देखील आधीच मॅनेज केलेले असतात.
अंधेरी पूर्वेतील भाजपाच्या कार्यालयात असाच प्रकार पाहायला मिळाला जेथे श्रोते केवळ फुकट चाय आणि भजी खाण्यासाठीच जमले होते हे दिसते. त्याचा व्हिडिओ देखील खाली पुरावा म्हणून देत आहोत.
#VIDEO : अशा होतात मन की बात ‘फुकट चाय-भजी’ के साथ
