औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि लोकविकास सहकारी बॅंकेचे संस्थापक जे.के. उर्फ जगन्नाथ खंडेराव जाधव यांच्या विरोधात तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा ऊर्फ किशोर रतन चिलघर या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी सदर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत तरुण हा जाधव यांच्याकडे चालक म्हणून तात्पुरत्या कामाला होता.

कृष्णा चिलघर हा मूळचा औरंगाबादमधील संजयनगर येथे वास्तव्यास होता. दरम्यान, तो लोकविकास बँकेचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय ग्रामीण पुर्नरचना संस्थेचे अध्यक्ष जे.के जाधव यांच्याकडे मागील २ वर्ष कारचालक म्हणून नोकरी करत होता. त्याला प्रति महिना दहा हजार रुपये इतकं वेतन होतं. जाधव यांनी कृष्णाला संस्थेअंतर्गत येणाऱ्या राजर्षी शाहू इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट या चिकलठाणा MIDC’तील संस्थेत शिपाई पदावर कायमस्वरूपी नोकरी लावून देतो असे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु या मोबदल्यात त्यांनी तब्बल ३ लाख रकमेची मागणी लावून धरली होती.

परंतु, आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने त्याच्याकडे ३ लाख रुपये असणे शक्य नव्हते. म्हणून अखेर कायमस्वरूपी नोकरीच्या आमिषाने कृष्णाने लोकविकास नागरी सहकारी बँकेतून कर्ज घेतले. त्यानुसार बँकेने त्याला १ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर कृष्णा संस्थेत शिपाई म्हणून रुजू झाला होता. दरम्यान, कृष्णाने जून २०१७ रोजी जाधव यांना एक लाख ६० हजार रुपये दिले होते. तर त्याच शिपाई पदावर कायम झाल्यावर उर्वरित रक्कम म्हणेज १ लाख ४० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यासाठी जाधव यांनी कृष्णाकडून २ ब्लँक चेक सुद्धा घेतले होते.

त्यानंतर ६ महिन्यांनी म्हणजेच ३० डिसेंबर २०१७ रोजी कृष्णाने शिपाई पदावर स्वतःला कायम करण्याबाबत आणि पगाराबाबत जाधव यांच्याकडे मागणी केली. परंतु, आधीची उर्वरित रक्कम दिल्यावरच पदावर कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल, असे जाधव यांनी कृष्णाला स्पष्ट सांगितले. यावरुन दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आणि अखेर जाधव यांनी कृष्णाला थेट कामावरुन कमी केले. त्यानंतर नोकरीच हिरावून घेतल्याने ७ फेब्रुवारी २०१८ रोजी त्याने जाधव यांच्याकडे कायमस्वरूपी नोकरीच्या मोबाटल्यात दिलेल्या पैशांची मागणी केली. मात्र जाधव यांनी पैसे परत देण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच त्याला थेट धमकी सुद्धा दिली.

unemployed youth commits suicide blames bjp leader case registered against j k jadhav