25 September 2023 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Karnataka Bank Share Price | बँक FD सोडा! कर्नाटक बँक शेअरने अवघ्या 6 महिन्यात 95 टक्के परतावा दिला, आता नवीन टार्गेट प्राईस पहा Gold Rate Today | गुड-न्यूज! आज तुमच्या शहरातील सोन्याचे भाव जोरदार घसरले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या Stocks to Buy | साउथ इंडियन बँकेचा शेअर 26 रुपयाचा, पण 6 दिवसात 13.50 टक्के परतावा दिला, आता 15 टक्के कमाई करा Tata Power Vs GMR Power Share | कोणता शेअर पॉवर दाखवेल? या शेअरने 1 महिन्यात 74% परतावा दिला, कोणता शेअर आहे स्वस्त? Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे टॉप 5 शेअर्स मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, फायद्याची यादी सेव्ह करा Mangal Ketu Yuti | या आहेत त्या 3 भाग्यवान राशी, मंगळ-केतूच्या युतीने नशीब फळफळणार, अत्यंत फायदेशीर काळ, तुमची राशी आहे? HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर! हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉक स्प्लिट होणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
x

आता डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खूश असेल: नीलेश राणे

रत्नागिरी : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी मुंबई नाइट लाइफची मागणी देवाकडे इतकी मनापासून केली की डान्स बार पुन्हा चालू झाले, अशी बोचरी टीका करत माजी खासदार निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात डान्सबार सुरु करण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा केला असतानाच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईमध्ये नाईटलाईफ’ची आदित्य ठाकरेंची जुनी मागणी आणि त्याचा धागा पकडून निलेश राणेंनी ट्विट केले आहे आणि त्याला समाज माध्यमांवर खूप प्रतिसाद मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेला लक्ष्य करत आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याने शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी त्यांचे पुतळेही जाळले होते. त्यानंतर शिवसैनिकांना थेट आवाहन देत पुतळे कसले जळता, हिम्मत असेल तर समोर या आणि परत जाऊन दाखवा असे खुले आवाहन केले होते. त्यानंतर कालच्या डान्स बार आणि नाईट लाईफचा संदर्भ जोडत त्यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष केले आहे.

काय म्हटलं आहे त्यांनी ट्विट करत?

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x