29 March 2024 8:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

Uttar Pradesh Lakhimpur Kheri Car Run on Farmers | केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांवर कार चढविली, २ शेतकऱ्यांचा मृत्यू

Uttar Pradesh Lakhimpur Kheri Car Run on Farmers

लखनऊ, ०३ ऑक्टोबर | काळे झेंडे दाखविणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलाने कार चढविल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी दोन गाड्यांची (Uttar Pradesh Lakhimpur Kheri Car Run on Farmers) जाळपोळ केली आहे. यामध्ये एक पत्रकार देखील जखमी झाला आहे.

Uttar Pradesh Lakhimpur Kheri Car Run on Farmers. Several persons were injured and three vehicles were set on fire when protests on farm laws took a violent turn and unidentified persons opened fire at the farmers. One of the vehicles belongs to Ashish Mishra, son of Union Minister of State for Home, Ajay Mishra Teni :

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीचे खासदार आणि गृह राज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा मोनू मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी चढविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उप मुख्यमंत्री केशव मोर्य यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी तिकोनिया येथे जमले होते. त्यांच्यावर गाडी आदळण्यात आली आहे.

अजय मिश्र टेनी यांच्या मूळ गावी आज उपमुख्यमंत्र्यांची सभा होती. तेथे ते उपमुख्यमंत्री जाणार होते. त्या आधीच आंदोलक शेतकरी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर झालेल्या हाणामारीत काही शेतकरी जखमी झाले आहेत. तर मोनू मिश्राने या शेतकऱ्यांवर गाडी चालविल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोनूच्या दोन ते तीन गाड्या पेटवून दिल्या आहेत. यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. उप मुख्यमंत्री केशव मोर्य यांचा होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Uttar Pradesh Lakhimpur Kheri Car Run on Farmers.

हॅशटॅग्स

#UttarPradesh(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x