17 May 2021 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू हट्टी मोदी सरकार वैज्ञानिकांचे सल्ले देखील ऐकत नाहीत | डॉ. जमील यांचा कोरोना सल्लागार गट प्रमुख पदाचा राजीनामा
x

JEE - NEET | महाराष्ट्र सह 6 राज्यांची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Supreme Court, Postponing JEE NEET Main, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, ४ सप्टेंबर : भारतामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना NEET-UG आणि JEE Mains 2020 च्या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत यासाठी महाराष्ट्र सह देशातील 6 राज्यांच्या मंत्र्यांकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र आज कोर्टाने त्या फेटाळून लावल्या आहे. 17 ऑगस्ट दिवशी सुनावणी करताना कोर्टाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार, देशभर जेईई मेन्स आणि नीट 2020 ची परीक्षा होईल असं म्हटलं होतं. दरम्यान देशात 1 सप्टेंबर पासून जेईई मेन्स परीक्षा सुरू झाली आहे. त्या 6 सप्टेंबर पर्यंत घेतल्या जातील.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नीट आणि जेईई (Main) या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सहा राज्यांच्या मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत पुनर्विचार याचिका दाखल केली होती. शुक्रवारी यावर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली. परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचं सहा राज्यांच्या मंत्र्यांनी दाखल केलेल्या याचिकेत नमूद करण्यात आलं होतं. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

 

News English Summary: Supreme Court refuses to entertain the review petition filed by ministers of six states, seeking review of the court’s August 17 order to conduct NEET-UG and JEE (Mains) examinations.

News English Title: Supreme Court Dismisses 6 Opposition Ruled States Appeal On Postponing JEE NEET Main Marathi News LIVE latest Updates.

हॅशटॅग्स

#JEE Exam 2020(9)#NEET EXAM 2020(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x