5 June 2023 10:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | तो फ्लॅटफॉर्मवर तरुणीच्या मागे सावकाश चालत होता, मेट्रो ट्रेन जवळ येताच तिला उचलून रुळावर उडी मारली आणि.... Spider-Man | स्पायडरमॅन चित्रपटाने अवघ्या 4 दिवसात 1700 कोटींचा टप्पा ओलांडला, भारतीय बॉक्स ऑफिसवर एक विक्रम Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 06 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Kore Digital IPO | कोर डिजिटल IPO किती सबस्क्राईब झाला? शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहिल्याच दिवशी मोठा परतावा देणार? Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या स्वस्त शेअर्समध्ये बंपर तेजी, एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअरमध्ये आदळ आपट सुरू, काही शेअर्स हिरव्या निशाणीवर तर काही शेअर्स लाल Numerology Horoscope | 06 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

शिवसेनेची आडकाठी नाही, पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न | खासदार भावना गवळींनी सांगितलं वास्तव

Shivsena

वाशीम, १५ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटर बॉम्बवर वाशिम-यवतमाळ मतदारसंघाच्या शिवसेनेचे खासदार भावना गवळी यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली. जिल्ह्यातील नॅशनल हायवेची जवळपास 90 टक्के कामे ही पूर्ण झाली आहेत. ज्या ठिकाणी ही कामे राहिलेली आहेत. ती फॉरेस्ट किंवा काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही, तर काही ठिकाणी शेतकरी न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे तेथील काम थांबवलेले आहे. शिवसेनेने कुठल्याही कामात आडकाठी केली नाही, किंवा कोणतेही काम थांबवलेले नाही. गडकरी साहेबांकडे काहीतरी चुकीची माहिती गेली असावी, मी स्वतः गडकरी साहेबाना भेटून या सम्पूर्ण विषयावर चर्चा करणार असल्याचे स्पष्टीकरण खासदार गवळी यांनी दिले आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसेनेचे लोकप्रतिनधी आडकाठी आणत असल्याची तक्रार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे मत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित एक ऑडियो क्लिपदेखील व्हायरल झाली होती. यासंबधी पत्रकारांनी खासदार गवळी यांना प्रश्न विचारला असता, ‘आमच्या रिसोडच्या शिवसैनिकाची जी ऑडियो क्लिप आहे, त्यामध्ये ते शिवसैनिक चांगले काम करावे, असे बोलत आहेत आणि त्या पाधिकाऱ्यांनी रिसोड शहरातील खड्डे स्वतः उभे राहून भरून घेतले आहेत. कोणीही काही ऑडिओ क्लिप व्हायरल करत असतील याला काही अर्थ नाही, काही लोकांचे आमच्या विरोधात हे षड्यंत्र आहे. जाणून बुजून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप गवळी यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपावर बोलताना खासदार भावना गवळी यांनी उत्तर दिले की, ज्यांनी आरोप केले आहेत, त्यांनीच हे सांगावा की कुठून काय आले, ते आमचे पाहिले सहकारी राहिलेले आहेत. त्यांना माझ्या समोर बसावा, आणि मला विचारावे मी त्यांच्या आरोपाचे जरूर उत्तर देईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena MP Bhavana Gawali denied allegation made in Nitin Gadkari’s letter to CM Uddhav Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x