4 December 2022 8:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Weekly Horoscope | 5 ते 11 डिसेंबर | 12 राशींसाठी कसा राहील आगामी आठवडा, नशिबाची साथ कोणाला? Lakshmi Narayan Raj Yog | लक्ष्मी नारायण राजयोग उजळणार या राशींच्या लोकांचे भाग्य, प्रत्येक कामात यश मिळेल, तुमची राशी? एक 'सोंगाड्या' आहे जो सकाळी भगवा आणि दुपारी हिरवा असतो, मनसेच्या गजानन काळेंचा धार्मिक टोला कोणाला? Fast Money Share | हा शेअर एकदिवसात 20 टक्के वाढतोय, स्टॉक वाढीचे कारण काय? हा स्टॉक खरेदी करणार? Mutual Fund Calculator | 5000 ची SIP बनवते करोडपती, SIP गुंतवणुकीचे फायदे वाचा, पैसे गुणाकार गणित समजून घ्या Numerology Horoscope | 04 डिसेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Horoscope Today | 04 डिसेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

आ. भुमरे नव्हे, औरंगाबाद पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पैठणमध्ये सभेच्या नावाखाली मराठवाड्यातील भाजप-शिंदे गटाचं शक्तिप्रदर्श, भाजपची रसद

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये सभा झाली. एकनाथ शिंदे यांच्या या सभेपूर्वी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिपचा आधार घेऊन विरोधकांनी शिंदेंवर निशाणा साधला. पैसे देऊन सभेसाठी गर्दी जमवली, असल्याचं म्हटलं गेलं. विरोधकांच्या आरोपाला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं.

उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा :
पैठण येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तर विरोधी पक्षनेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी गणपती दर्शनावरून केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.

मी एकदा शब्द दिला की पाळतो. जेव्हा अन्याय झाला. मुस्कटदाबी झाली. त्यावेळी भुमरे माझ्याकडे आले आणि म्हणाले, काय करायचं? मी त्यांना म्हणालो की, जे चाललंय ते चालू द्या. मला काही प्रॉब्लेम नाही. भुमरेंनी शब्द दिला आणि पाळला. सगळ्यांनी कार्यक्रम करायचं ठरवलं होतं, पण ५० लोक पुरून उरले”, असं शिंदेंनी उत्तर दिलं.

औरंगाबाद निवडणुका – मराठवाड्यातील भाजपने रसद पुरवली :
या सभेला भाजपने मराठवाड्यातील दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. अन्यथा भाजपाचे कार्यकर्ते हजर राहणार नाहीत अशी भाजपाला शंका असल्याने या केंद्रीय मंत्रांना शक्ती पणाला लावण्यास सांगितले होते. तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातून गर्दी जमविण्यासाठी लोकं आणण्यात आली होती. त्याची जवाबदारी या क्षेत्रातील शिंदे समर्थक मंत्र्यांना देण्यात आली होती. त्यामुळे ही गर्दी पैठणमधील जनतेची असल्याचं पूर्णपणे खोटं असून हे एकूण शिंदे गट आणि भाजपने आगामी औरंगाबाद महानगपालिकेच्या अनुषंगाने ही सभा आयोजित केली होतं असं समोर आलं आहे.

राज्यातील मतदार आपल्यासोबत असल्याचा संदेश राज्यात देण्यासाठी शिंदे यांना फडणवीसांनी हा सल्ला दिला होता असं वृत्त आहे. त्यासाठीच भाजपच्या मराठवाड्यातील केंद्रीय मंत्र्यांना या सभेला हजर राहण्याचे आदेश देताना लोकं जमविण्याची देखील जवाबदारी देण्यात आली असती. ते झालं नाही तर शिंदे गट आणि भाजपच्या विरोधात जनमानसात नकारात्मक संदेश जाणार नाही यासाठी विशेष खबरदारी भाजपच्या नेत्यांनी घेतली होती असं भाजपच्या गोटातून समजलं आहे. त्यासाठी सरकारी पातळीवर संपूर्ण प्रशासन देखील कामाला लावण्यात आलं होतं. औरंगाबादमध्ये हिंदू-मुस्लिम मुद्दा महत्वाचा असल्याने शिंदेंनी भाषणात शेवटच्या क्षणी दाऊद आणि याकूब मेमन याच्या कबरीच्या मुद्दा भाजपच्या सांगण्यावर उपस्थित केला असं देखील समजतंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde in Aurangabad Paithan check details 12 September 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x