9 May 2021 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
थोडी जरी लाज शिल्लक असेल तर देशाची जाहीर माफी मागा | केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा - पी. चिदंबरम इतिहास घुसमटला | दिल्ली इंडिया गेटच्या श्वास आणि देशवासीयांचा श्वास एकाच वेळी घूसमटत आहे कोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू मोदी भक्तांनो! तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले - लेखिका विनिता मोक्किल सुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधानांकडून राज्याची स्तुती | पण फडणवीसांना बनवाबनवीची शंका Health First | तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्या दैनंदिन गोष्टीत हे बदल करा केंद्र सरकारचा ढिम्म कारभार | अखेर सुप्रीम कोर्टाकडून १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना
x

केंद्र सरकार कोकणात विशेष रेल्वे सोडायला तयार, ठाकरे सरकारकडून मागणीच नाही - आ. आशिष शेलार

Ashish Shelar, Raised Questions, Mahavikas aghdi, Ganesh Festival

मुंबई, २४ जुलै : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना चाकरमान्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय ठाकरे सरकारने घेतला नसून, आता यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. एवढेच नाही तर चाकरमान्यांची कोंडी करण्याची ठाकरे सरकारची इच्छा असल्याचा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना कोकणातील चाकरमान्यांना गणपतीसाठी गावाकडे जाण्याबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्राकडून रेल्वे गाड्यांची मागणी केलेली नाही. ई-पास व इतर वाहतूक सुविधांचा पत्ता नाही. त्यामुळे सरकारला कोकणी माणसाची सगळ्या बाजूने कोंडी करायची आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करून ठाकरे सरकारला सवाल केला आहे. “ग्रामपंचायतीना क्वारंटाइन सेंटरमध्ये गरम पाणी, शौचालये, औषधांसाठी ना विशेष निधी दिला. ना गणेशोत्सवाबाबत वेळीच निर्णय जाहीर केला. रेल्वे मंत्री विशेष गाड्या सोडायला तयार आहे, पण राज्य सरकारची मागणीच नाही. ग्रामस्थ आणि चाकरमान्यांत दरी वाढतेय. आमच्या कोकणी माणसांशी का राज्य सरकार असं वागतेय?,” असं शेलार यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: With Ganeshotsav just a few days away, the Thackeray government has not taken any concrete decision regarding Chakarmanya, now BJP MLA Ashish Shelar has criticized the Thackeray government over this. Not only that, Ashish Shelar has slammed the Thackeray government for wanting to embarrass the servants.

News English Title: Ashish Shelar Raised Questions On Maharashtra Government Stand About Ganesh Festival News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x