26 April 2024 1:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

दिल्ली हिंसाचार: शाहरुखला दिल्ली पोलिसांकडून अटक

Delhi Violence, Delhi Police, Shahrukh

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचारावेळी गोळीबार करणाऱ्या शाहरुखला ताब्यात घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. उत्तर प्रदेशातील शामली इथून शाहरुखला ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. दिल्ली हिंसाचाराच्या दरम्यान थेट पोलिसांवरच शाहरुखने पिस्तुल रोखलं होतं. त्याने तीन राउंड फायर केले होते. शाहरुखची चौकशी सुरू असून तो टिकटॉक व्हिडिओ करायचा तसेच मॉडेलिंगची आवड असल्याचंही समोर आलं आहे.

दिल्ली पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करत आहेत. शिवाय, त्याला आश्रय देणाऱ्यांचा देखील तपास सुरू आहे. दिल्लीतील हिंसाचारादरम्यान २४ फेब्रवारी रोजी एका तरूणाने पोलीस कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखल्याचा फोटो माध्यमांवर आला होता. शिवाय, त्याने हिंसचार घडत असलेल्या ठिकाणी आठ गोळ्या देखील झाडल्या होत्या. मात्र नंतर तो गर्दीचा फायदा घेत फरार झाला होता.

सुरुवातीच्या चौकशीत तो एकटाच आंदोलनात सहभागी होण्यासाठी आला असल्याचे उघडकीस आले. त्याला कोर्टात हजर करायचे असून त्यानंतर उर्वरित लोकांची चौकशी केली जाईल. शाहरुखने पळ काढण्यासाठी एस्टीम गाडीचा वापर केला होता. आम्ही आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनशी त्याचा काही संबंध आहे का? याची चौकशी करू. त्याच्याविरूद्ध भा. दं. वि. कलम १८६, ३५३, ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती देखील शिंगला यांनी दिली.

 

News English Summery: Delhi Police held a press conference after Shahrukh was taken into custody after firing on Delhi violence. Shahrukh was taken into custody from Shamli in Uttar Pradesh, police said. Shahrukh had kept a pistol at the police directly during the Delhi violence. He had fired three rounds. Shahrukh’s inquiry is underway and he has come forward to do a talkative video and has a love for modeling. Initial inquiries revealed that he had come alone to join the movement. He is expected to appear in court and the rest will be interrogated. Shahrukh had used the Esteem train to escape. Do we have anything to do with your suspended councilor Tahir Hussain? Let’s inquire. Brother against him. S Vs. Shingla also informed that a crime has been registered under sections 186, 353, 307.

 

Web News Title: Story Delhi violence who Shahrukh how did he get caught by Delhi police.

हॅशटॅग्स

#Delhi(14)#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x