19 April 2024 6:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

KDMC निवडणूक | राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनीच केली निवडणूक एकत्र लढविण्याची घोषणा

Shisvena NCP and congress, KDMC Election, MahaVikas Aghadi

कल्याण, २६ नोव्हेंबर: कोरोनाने पुन्हा जोर धरलेला असताना राज्यात महत्वाच्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यातील एक महत्वाची महानगरपालिका म्हणजे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका म्हणावी लागेल. राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.

सध्याच्या घडीला या महानगरपालिकेत भाजप, शिवसेना आणि मनसेची मोठी ताकद आहे. काँग्रेसचं इथे नोंद घावी असं अस्तित्व नाही. शिवसेना, भाजप आणि मनसेचं संघटन चांगल्याप्रकारे आहे. राष्ट्रवादीची देखील थोडयापार प्रमाणात ताकद आहे. असं असताना देखील एक मोठी घटना राष्ट्रवादीच्या बाबतीत घडली आहे. कारण कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शह देण्यासाठी आम्ही चांगली एकता तयार करु, अशी प्रतिक्रिया जगन्नाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीचे केवळ दोनच नगरसेवक आहेत. पक्षाला तारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांना जिल्हाध्यक्षपदाची जवाबदारी सोपविली आहे. आज जगन्नाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या घरी मोठ्या संख्येने जमा झाले होते.

महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार आहे. शिवसेना, काँग्रेस आाणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक सुद्धा महाविकास आघाडी लढवणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. सगळ्यांना समान न्याय देताना पुन्हा एकदा महापौर आघाडीचा कसा येईल याकडे माझे लक्ष आहे, असं जगन्नाथ शिंदे यांनी सांगितलं.

 

News English Summary: NCP has announced to contest Kalyan Dombivali Municipal Corporation election together. The newly appointed district president of NCP, former MLA Jagannath Shinde made the official announcement in this regard. “We will build good unity to support the Bharatiya Janata Party and the Maharashtra Navnirman Sena,” Jagannath Shinde told the media.

News English Title: Shisvena NCP and congress will contest KDMC Election in alliance of MahaVikas Aghadi news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x