15 December 2024 8:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

प. बंगाल | भाजपचे कालिगंजचे आमदार सौमेन रॉय यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

BJP MLA Soumen Roy

कोलकाता, ०४ सप्टेंबर | पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. येथे कालिगंजमधील भाजपचे आमदार सौमेन रॉय यांनी पक्षाला निरोप देतानाच ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या उपस्थितीत कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले. सौमेन यांनी या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कालीगंज मतदारसंघातून तृणमूल उमेदवार तपन देब सिंघा यांचा 94,948 मतांनी पराभव केला होता.

प. बंगाल, भाजपचे कालिगंजचे आमदार सौमेन रॉय यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश – BJP MLA From Kaliaganj Soumen Roy Joins TMC In Kolkata West Bengal :

शिखा मित्रादेखील 29 ऑगस्ट रोजी टीएमसीमध्ये सामील झाल्या. यापूर्वी पश्चिम बंगाल काँग्रेसचे माजी अध्यक्ष (दिवंगत) सोमन मित्रा यांच्या पत्नी शिखा मित्राही 29 ऑगस्ट रोजी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) सामील झाल्या होत्या. यादरम्यान, शिखा यांनी दावा केला होता की मी 2014 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदारपदाचा राजीनामा दिला असला, तरीही मी कधीही अधिकृतपणे पक्ष सोडला नव्हता.

मित्रा म्हणाल्या होत्या की, माझ्या पतीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले, पण मी सक्रिय राजकारणातून ब्रेक घेतला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मला टीएमसीची सक्रिय कार्यकर्ता होण्यासाठी विनंती केली होती. त्यांचा साधेपणा आणि व्यक्तिमत्त्व पाहून मी खूप प्रभावित झाले.

पोटनिवडणुकीची घोषणा:
दरम्यान, निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश, ओडिशासह पश्चिम बंगालच्या तीन विधानसभा जागांवर पोटनिवडणूक घेण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बंगालमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये भवानीपूरची जागादेखील समाविष्ट आहे, जिथून मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना निवडणूक लढवायची आहे. 30 सप्टेंबर रोजी निवडणुका होणार आहेत आणि 3 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होतील.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MLA From Kaliaganj Soumen Roy Joins TMC In Kolkata West Bengal.

हॅशटॅग्स

#WestBengalAssemblyElection2021(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x