29 September 2020 4:13 AM
अँप डाउनलोड

हार्दिक पटेल २० दिवसांपासून बेपत्ता; पत्नी किंजल पटेल यांचा दावा

Congress Leader Hardik Patel

गांधीनगर: गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल तब्बल २० दिवसांपासून बेपत्ता असल्याचा दावा त्यांच्या पत्नी किंजल पटेल यांनी केला आहे. १८ जानेवारीपासून हार्दिक पटेल बेपत्ता असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, गुजरात सरकार हार्दिक पटेल यांना लक्ष्य करत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पाटीदार समाजातील नेत्यांवर असलेले सर्व गुन्हे मागे घेतले असल्याचं २०१७ मध्ये या सरकारनं सांगितलं. मात्र आता ते एकट्या हार्दिकला का लक्ष्य करत आहे. पाटीदार समाजाच्या चळवळीत सहभागी झालेल्या आणि आता भाजपत गेलेल्या इतर दोन नेत्यांना का हात लावला जात नाही? असाही प्रश्नही तिनं विचारला आहे. हार्दिकनं पाटीदार समजाशी संपर्क साधू नये, त्यांच्या समस्या जाणून घेऊ नये असंच या सरकारला वाटत आहे, असंही तिनं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

पटेल यांनी सन २०१५ मध्ये पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे याबाबतच्या आंदोलनाशी संबंधित राजद्रोहाच्या प्रकरणाचा सामना करत आहेत. पटेल यांना अटक केल्यानंतर त्यांना चार दिवसांनंतर जामीन देण्यात आला होता. मात्र, पाटन आणि गांधीनगर जिल्ह्यांमध्ये दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली होती. पटेल यांना २४ जानेवारी या दिवशी जामीन मिळाल होता.

 

Web Title: Congress Leader Hardik Patel missing since last 20 days says his wife

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Hardik Patel(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x