19 February 2025 12:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC FD Interest Rates | HDFC बँकेच्या एफडीमध्ये 33,750 रुपये केवळ व्याजाने मिळतील, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | पत्नीच्या नावाने पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा, मिळेल भरभरून लाभ, लाखोंच्या घरात पैसे कमवाल Realme P3x 5G | 'हा' ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करा केवळ 15,000 रुपयांत, मिळेल प्रीमियम लेदर आणि डिझाईन देखील नवीन IRFC Share Price | मल्टिबॅगर आयआरएफसी शेअरबाबत मोठे संकेत, शेअर प्राईस 50 रुपयांपर्यंत घसरणार का - NSE: IRFC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर घसरतोय, पण पुढे पैसे डबल होऊ शकतात, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | रुळावरून घसरतोय हा रेल्वे कंपनी शेअर, स्टॉकबाबत तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - NSE: RVNL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरमधील घसरण थांबेना, मात्र तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत - NSE: JIOFIN
x

TRP Scam | मुंबई पोलीस ऍक्शनमध्ये येताच अँटी महाराष्ट्र टिवटिव मंदावली

Mumbai Police, Fake TRP Scam, Twitter Trends

मुंबई, १७ ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी त्याबाबत अधिकृत माहिती दिली होती.

ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन मुंबई पोलीस आयुक्तांची प्रतीमा मलिन करण्यासाठी शिस्तबद्ध कँपेन चालविण्यात आलं होतं. विशेष त्यांच्याविरोधात अश्लाघ्य भाषेचा वापर केला आणि मुंबई पोलीस दलाला बदनाम करण्याची मोठी योजना सातत्याने राबवली गेल्याच पाहायला मिळालं होतं. सदर प्रकरणी आयटी कायद्याअंतर्गत अनेक सोशल मीडिया अकाऊंट आणि बनावट अकाऊंटवर गुन्हे दाखल केले गेले, अशी माहिती रश्मी करंदीकर यांनी दिली होती आणि तिथेच डिजिटल गुन्हेगारांचे धाबे दणाणले.

मात्र मुंबई पोलिसांचा दुसरा सक्तीचा आदेश निघाला आणि तो म्हणजे निष्कारण बॉलीवूड कलाकारांना पाठलाग करून त्रास देऊ नये. त्यानंतर तिसरा आश्चर्याचा धक्का पोलिसांनी दिला तो Fake TRP Scam बाबत. त्यानंतर टीव्ही वृत्तवाहिन्यांवरून धार्मिक आणि राज्य सरकार विरोधात कोणत्याही पुराव्याशिवाय गरळ ओकणाऱ्या काही ठराविक वृत्त वाहिन्यांचे धाबेच दणाणले. त्यात Republic TV केंद्रस्थानी आहे आणि त्यांच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस धाडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. TRP scam मध्ये सत्यता असल्यानेच BARC’ने TRP रेटिंगवर ३ महिने बंदी घातली आहे. त्यात सर्वोच्च न्यालयाकडून निराशा पदरी पडल्याने ‘पेड’ सोशल मीडिया एजन्ट आणि एका ठराविक विचारधारेच्या पक्षाचे समर्थक ट्विटरवर टिवटिव करणे कमी झाले.

AIIMS च्या रिपोर्टनंतर सुशांत सिंग प्रकरणात काहीच समोर येणार नसल्याचे सूतोवाच मिळाल्याने देशातील सत्ताधारी देखील याप्रकरणात थंडावले आहेत. मात्र पोलिसांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेने समाज माध्यमांवरील फिल्मी नेटिझन्स मात्र बिथरल्याचं चित्र आहे.

 

News English Summary: A disciplined campaign was launched on various social media platforms like Twitter, Instagram and Facebook to tarnish the image of the Mumbai Police Commissioner. In particular, vulgar language was used against him and a big plan to discredit the Mumbai police force was consistently implemented. According to Rashmi Karandikar, a number of social media accounts and fake accounts were registered under the IT Act in the case and digital criminals were spotted there.

News English Title: Mumbai Police strict stand after Fake TRP Scam Twitter anti Bollywood and Anti Maharashtra trends are stopped News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x