24 April 2024 1:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

आम्ही इतके, तुम्ही तितके..अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना इतकंच सांगतो...तर मनसे दणका?

Hindu Muslim, MNS Chief Raj Thackeray, MIM Former MLA Waris Pathan

मुंबई: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे वादग्रस्त नेते माजी आमदार वारीस पठाण यांनी पुन्हा एकदा धार्मिक भावना भडकवणारं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. एमआयएम’चे मुंबईतील माजी आमदार वारीस पठाण अशी वक्तव्य करण्यात माहीर असून, यापूर्वी देखील त्यांनी अशी धार्मिक भावना भडकवणारी विधानं केली आहेत.

दरम्यान, मनसेने वारीस पठाण यांना त्यांच्या संतापजनक धार्मिक वक्तव्यावरून सज्जड दम दिला आहे. मनसे पुन्हा हिंदुत्वाच्या भूमिकेवरून आक्रमक होतं ट्विट मध्ये म्हटलं आहे की, आम्ही…’ ‘तुम्ही…’ असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण…. ‘आम्ही’ इतके, ‘तुम्ही’ तितके… अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना ‘आम्ही’ इतकंच सांगतो की जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर ‘तुम्ही’ सगळेच भस्मसात व्हाल!

सध्या देशभरात CAA आणि NRC आंदोलनं पेटली आहेत आणि त्यात सर्वाधिक प्रमाण हे मुस्लिम समाज आणि मुस्लिम संघटनांचं आहे. त्यामुळे हा संपूर्ण विषय हिंदू-मुस्लिम असाच झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करून मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी वारीस पठाण यांनी असं धार्मिक विधान केलं असावं असं म्हटलं जातं आहे.

वारीस पाठ आंदोलकांना संबोधित करताना म्हणाले की, “१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट “असं ते म्हणाले आहेत. कर्नाटकमधील गुलबर्गा येथे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी १६ फेब्रुवारी रोजी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे याप्रसंगी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील उपस्थिती होती. या आंदोलनाच्या अनुषंगाने एमआयएम सुद्धा स्वतःची स्पेस बनवू इच्छित आहे असंच म्हणावं लागेल. त्यासाठी हिंदू मुस्लिम असं धार्मिक तेढ निर्माण करण्याचा एमआयएम’चा प्रयत्न असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे.

पुढे ते असं म्हणाले की, “केवळ शब्दांनी उत्तर देता येणार नाही, विटेला दगडाने उत्तर देणं आपण शिकलो आहोत. मात्र, एकत्र होऊन चालावं लागेल. स्वातंत्र्य घ्यावं लागेल व जी गोष्ट मागितल्याने मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागेल. हे लक्षात असू द्या. आता वेळ आली आहे, आम्हाला म्हणाले महिलांना पुढं केलं, आता तर फक्त वाघिणी बाहेर निघाल्या आहेत, तर तुम्हाला घाम फुटला. मग विचार करा आम्ही सोबत आलो तर काय होईल. १५ कोटी आहोत पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा. असं पठाण यावेळी म्हणाले आहेत. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

 

English Summery: Story MNS party warned MIM Former MLA Waris Pathan statement over Hindu and Muslim made at Karnataka Gulbarg.

 

Web Title: Story MNS party warned MIM Former MLA Waris Pathan statement over Hindu and Muslim.

हॅशटॅग्स

#MIM(30)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x