28 July 2021 7:17 PM
अँप डाउनलोड

तरुणाच्या गुप्तांगामध्ये पेट्रोल आणि स्क्रूड्रायव्हर टाकून मारहाण, संतापजनक प्रकार

Story Dalit youth assaulted stealing allegation in Rajasthan

नागौर: चोरीचा आरोप करत मोटारसायकल एजन्सीमध्ये तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गावातील काही समाजकंटकांनी आधी युवकाला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोल टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा सर्व प्रकार राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील पांचौड़ी परिसरात घडला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या व्हिडिओमध्ये दोन दलितांना काही लोक मारहाण करीत असल्याचे त्याचबरोबर त्यांच्यावर स्क्रूड्रायव्हरने हल्ला करीत असल्याचे दिसते. हल्लेखोरांपैकीच एकाने हा व्हिडिओ चित्रित केला आहे.

राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातीली पांचौडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हा प्रकार घडला आहे. येथील करणू सर्विस सेंटरमध्ये चोरी केल्याचा आरोप दोन तरुणांवर ठेवण्यात आला. त्यानंतर या सर्विस सेंटरमधील कर्मचाऱ्यांना या तरुणांना मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ३४२, ३२३, ३४१, १४३ आणि एसी/एटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये ७ जणांचा समावेश असून, यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नागौरचे एएसपी राजकुमार आणि डीएसपी मुकुल शर्मा करत आहेत.

 

English Summery:  Story horrific sickening Congress MP Rahul Gandhi on torture of 2 Rajasthan Dalits on video viral.

Web Title: Story Dalit youth assaulted stealing allegation in Rajasthan petrol and screwdriver thrown inside private part.

हॅशटॅग्स

#india(209)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x