15 August 2022 9:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Financial Tips | आर्थिक स्वातंत्र्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंतांपासून होईल सुटका Numerology Horoscope | मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Old Salary Account | तुमच्या जुन्या सॅलरी अकाउंटमुळे तुम्हाला हे 5 नुकसान होतात, अशाप्रकारे लवकर बंद करा Ola S1 e-Scooter | ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 141 किमी रेंजचा दावा, किंमतीसह सर्व माहिती जाणून घ्या Horoscope Today | 16 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Utsav Deposit Scheme | एसबीआयने सुरु केली उत्सव फिक्स्ड डिपॉझिट योजना, जाणून घ्या योजनेचे फायदे Gold Bond Scheme | तुम्हाला स्वस्त सोनं खरेदीची संधी मिळणार, जाणून घ्या कधीपर्यंत गुंतवणूक करू शकाल
x

वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडेंसह NCB च्या पथकावर ड्रग्ज विक्रेत्यांकडून हल्ला

NCP Zonal Director Sameer Wankhede, NCB Team Attacked, Drug Peddlers, Mumbai Goregaon

मुंबई, २३ नोव्हेंबर: बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे करणाऱ्या NCB च्या पथकावर हल्ला झाला आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात ड्रग्ज पेडलर्सला पकडण्यासाठी गेलेल्या NCB च्या पथकावर हल्ला झाला आहे. डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंसह त्यांच्या टीममधील पाच जणांवर यावेळी या पेडलर्सकडून हल्ला करण्यात आला. यात NCB चे दोन अधिकारी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून NCB चं पथक ठिकठिकाणी छापेमारी करत आहे. आज एनसीबीच्या पथकाकडून कॅरी मेंडिस नावाच्या ड्रग्ज पेडलर्सकडे छापेमारीसाठी गेली होती. त्यावेळी अचानक 50 ते 60 जणांच्या जमावाने तिथे गर्दी करत एनसीबीच्या पथकावर हल्ला केला. डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे आणि टीममधील पाच जणांवर यावेळी या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात एनसीबीच्या दोन अधिकारी जखमी झाले आहेत.

ही घटना काल रात्री घडली आहे. समीर वानखेडे हे कैरी मेंडिस नावाच्या व्यक्तीला पकडण्यास ते गेले होते. ड्रग्ज पेडलर कैरी मेंडिसला पकडताना हा हल्ला झाला. एकूण पाच लोकांची टीम या कारवाईसाठी गेली होती. कैरी मेंडिसला पकडून एनसीबी ऑफिसला आणण्यात आलं आहे. या हल्ला प्रकरणात एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे.

 

News English Summary: The NCB team that makes new revelations every day in the drug case in Bollywood has come under attack. An NCB team that went to catch drug peddlers in Mumbai’s Goregaon area has been attacked. Five members of his team, including dashing officer Sameer Wankhede, were attacked by the peddlers. Two NCB officers were injured.

News English Title: NCP Zonal Director Sameer Wankhede And His Team Were Attacked Allegedly By Drug Peddlers In Mumbai Goregaon News updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x