25 March 2025 9:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Trident Share Price | ट्रायडंट शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: TRIDENT GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअरमध्ये घसरण, महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अनुमान जाणून घ्या - NSE: GTLINFRA Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई, शेअर्स खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | 26 मार्च 2025; तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल, बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 26 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी अपडेट, सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या FD मध्ये पैसे गुंतवा, मोठा परतावा मिळवा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: TATAMOTORS
x

ब्रेकिंग न्युज: विवादित रझा अकादमीच्या मुस्लिम नेत्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

CM Uddhav Thackeray, Raza Academy, Azad Maidan Riot

मुंबई: कालच मुख्यमंत्री म्हणाले आमचा अंतरंग भगवाच आहे आणि आजच्या घटनेने शिवसेना मोठ्या राजकीय पेचात सापडण्याची शक्यता आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीवरुन सुरु असलेल्या वादावर मुंबईतील २०० मुस्लिम नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट घेतली आहे. पोलीस आयुक्तालयात ही भेट झाली. यावेळी या नेत्यांनी सीएए आणि एनआरसी विरोधात मुख्यमंत्र्यांकडे निषेध व्यक्त केला. ज्याप्रकारे पंजाब आणि केरळ सरकारने सीएएविरोधात कायदा पारित केला तशाप्रकारे महाराष्ट्रातही हा कायदा लागू करु नका अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावेळी कोणालाही हा देश सोडून जाण्याची गरज नाही असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांना दिलं.

यावेळी बोलताना पोलीस आयुक्त संजय बर्वे म्हणाले की, प्रत्येकाला आपला निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण एकाकडूनही कायदा सुव्यवस्था बिघडेल अशाप्रकारचे कृत्य अपेक्षित नाही. तर रझा अकादमीचे सय्यद नुरी यांनी सांगितले की, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यामध्ये आम्ही सीएए आणि एनआरसी या कायद्याविरोधातील आमच्या भावना मांडल्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की, आम्ही सगळे देशाचे नागरिक आहोत. आपलं नागरिकत्व हटवण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे कोणालाही देश सोडण्याची गरज नाही असं ते म्हणाले.

तर जामिया कदारिया अशरफियाचे नेते सय्यद मोईनुद्दीन अशरफ यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना आश्वस्त केलयं. मुंबई शहरावर प्रत्येक जाती, समुदाय आणि धर्माचा अधिकार आहे. सर्व लोकांचा यावर समान अधिकार आहे असं ते म्हणाले. दरम्यान, धार्मिक आधारावरील कायद्यामुळे समाजातील काही घटकांची भाषिक व सांस्कृतिक ओळख पुसली जाण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या आझाद मैदानावर ११ ऑगस्ट २०१२ रोजी उसळलेल्या दंगलीच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट होती. त्यावेळी वर्षभर आरोपी मोकाटच होते. त्यावेळी या दंगलप्रकरणी ६३ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुराव्याअभावी त्यातील ५ जणांची सुटका करण्यात आली होती, तर ४५ जणांना कोर्टाने जामीन मंजूर केला होता.

याघटनेच्या विरोधात शिवसेना, भाजप, मनसे, आरपीआय या राजकीय पक्षांसह इतर सामाजिक संघटनांनी निषेध मोर्चे काढले होते, मात्र त्याला आक्रमक स्वरूप केवळ मनसेनं दिलं होतं आणि त्यासाठी स्वतः राज ठाकरे रस्त्यावर उतरून आझाद मैदानावर धडकले होते आणि सरकारचे वाभाडे काढता पोलीस आणि पत्रकारांना धीर दिला होता. तसेच तत्कालीन पोलीस आयुक्त ज्यांनी रजा अकादमीच्या लोकांकडे डोळेझाक करत पोलिसांनाच सुनावले होते, त्यांची देखील राज ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेने तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने उचलबांगडी केली होती.

म्यानमारमधील मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी गेल्या ११ ऑगस्टला भेंडी बाजार ते आझाद मैदान असा ‘रझा अकादमी’ मार्फत मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाला येणाऱ्यांची संख्या कमी सांगितली गेल्याने पोलिसांनीही त्यानुसार बंदोबस्त लावला होता. परंतु, मोर्चा आझाद मैदानात पोहोचला तेव्हा हजारोंच्या संख्येने जमाव मोर्चात सामिल झाला. काहीवेळा नंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि जमावातून दगडफेकीला सुरूवात झाली. मोजकाच पोलिस बंदोबस्त असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणणे पोलिसांना कठीण जाऊ लागले. दगडफेकीचे रुपांतर दंगलीत झाले. यात अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. त्याच बरोबर प्रसारमाध्यमांच्या वाहनांचे, सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. विशेष म्हणजे तिथल्या ‘अमर ज्योत’ला देखील नासधूस करण्यात आलं होतं.

मोर्चा काढण्याच्या नावाखाली मुंबईत दहशत निर्माण करणाऱ्या ‘रझा अकादमी’चा बुरखा त्या प्रकारामुळे फाटला होता. त्या घटनेशी आमचा काहीएक संबंध नसल्याचा दावा करत त्यांनी माफीही मागितली होती. मात्र, ही संघटना पोलिसांप्रमाणे सर्वसामान्यांच्या देखील नजरेत आली होती.

या संघटनेची स्थापना सन १९७८ मध्ये अली उमर स्ट्रीट येथे झाली आहे. धार्मिक पुस्तके प्रकाशित करणे, अल्पसंख्याकांमध्ये शिक्षणाचा प्रसार, अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात संघर्ष करण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली. या अकादमीच्या दाव्याप्रमाणे त्यांनी आतापर्यंत ३०३ धार्मिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. अकदामीच्या स्थापनेनंतर इस्लामची शिकवण देण्यासाठी ‘रझा उल उलम’ मदरसा स्थापन केली. त्यात, मुलांपासून मोठ्यांनाही प्रवेश देण्याचे धोरण स्वीकारले गेले हे विशेष म्हणावे लागेल.

 

Web Title:  Maharashtra CM Uddhav Thackeray today meet Raza Academy and other Muslim association.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या