19 April 2024 8:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

परमबीर सिंह अडचणीत | राज्य सरकारने माजी पोलिस आयुक्तांचा तपास IPS संजय पांडेंकडे सोपवला

Senior IPS Sanjay Pandey, Parambir Singh

मुंबई, ११ एप्रिल: राज्यात सचिन वाझे प्रकरणात नवीन लढाई सुरू झाली आहे. राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंहांना घेरण्याची तयारी केली आहे. सरकार परमबीर सिंहांची वेगळी चौकशी करत आहे. याची जबाबदारी परमबीर सिंहांचे कट्टर विरोधी सीनियर IPS संजय पांडेंना देण्यात आली आहे.

सरकारने संजय पांडे यांना पोलिस महासंचालकांचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. शुक्रवारी उशिरा याची घोषणा करण्यात आली. संजय पांडे यांना ही जबाबदारी देण्यामागे परमबीर सिंहांचा तपास एक प्रमुख कारण आहे. बऱ्याच वर्षांपासून पोलिस कॅडरच्या बाहेर असलेले संजय पांडे यांना इतक्या सहजपणे डीजीचा अतिरिक्त पदभार मिळवणे कठीण होते. विशेषत: जेव्हा ते पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होत आहेत.

संजय पांडे यांनी पत्रात लिहिले आहे की एडीजी देवेन भारती यांच्या तपासादरम्यान परमबीर सिंह यांनी साक्षीदारांना धमकावले होते. अतिरिक्त सचिवांनी या प्रकरणातील तपास थांबवला होता. पांडे यांनी लिहिले की, अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना भारती यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. जेव्हा तपास अहवाल सादर केला गेला तेव्हा शरद पवार यांच्यापासून सर्वांनी त्याचे कौतुक केले. असे असूनही, परमबीर व अतिरिक्त सचिवांनी तपास थांबवला.

मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे सरकारने 1 एप्रिल रोजी संजय पांडे यांच्याकडे परमबीर सिंहांचा तपास सोपवला. अनिल देशमुख त्यावेळी राज्याचे गृहमंत्री होते. असे म्हटले जात आहे की तपासणीत काही आढळल्यास परमबीर सिंहांना निलंबित केले जाऊ शकते. असे बोलले जात आहे की, जर संजय पांडे चौकशी करत असतील तर तपासात काहीना काही परमबीर सिंहांच्याविरोधात निघू शकते.

 

News English Summary: A new battle has started in the Sachin Waze case in the state. The state government is preparing to surround former Mumbai Police Commissioner Parambir Singh. The government is investigating Parambir Singh separately. Responsibility for this has been given to senior IPS Sanjay Pandey, a staunch opponent of Parambir Singh.

News English Title: Senior IPS Sanjay Pandey will make investigation of former Mumbai Police commissioner Parambir Singh news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x