एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसैनिकांची घोषणाबाजी | शिवसैनिकांकडून दोघा मनसे कार्यकर्त्यांना चोप
वसई, ५ जानेवारी: मनसे आणि शिवसैनिकांमधील वैर सर्वश्रुत आहे. त्यात ठाण्यातील शिवसेना आणि मनसेतील वादामुळे ठाण्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे मनसेच्या नेहमीच रडारवर असतात. दरम्यान आज वसईतील एका कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली असता स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वादाचं कारण होतं वसई-विरार महापालिकेचे आयुक्त. यावेळी “आयुक्त साहेब वेळ द्या, आयुक्त साहेब वेळ द्या” अशा घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
त्यानंतर काहीसा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मात्र सदर ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक देखील उपस्थित होते. संबंधित मनसे कार्यकर्त्यांना वसई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं खरे, पण त्यावेळेच्या बाचाबाचीत शिवसैनिकांनी घोषणाबाजी करणाऱ्या दोघा मनसे कार्यकर्त्यांना बेदम चोप देत कार्यक्रमातून बाहेर काढलं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळ्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे वसईत उपस्थित होते. त्यावेळी अचानक हा प्रकार घडला. एकनाथ शिंदेंकडे ठाण्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा आहे आणि त्यामुळे पोलिसांनी देखील विशेष काळजी घेतली होती.
News English Summary: While Eknath Shinde was attending a program in Vasai today, local Maharashtra Navnirman Sena activists shouted slogans. The reason for the dispute was the Vasai-Virar Municipal Commissioner. On this occasion, the activists of Maharashtra Navnirman Sena gave the slogan “Commissioner Saheb give time, Commissioner Saheb give time”. It is true that Vasai police arrested both the concerned MNS workers, but during the altercation at that time, Shiv Sainiks beat the two MNS workers who were shouting slogans and kicked them out of the program. After that, the police have arrested both the MNS activists.
News English Title: MNS party workers ruckus at Minister eknath Shinde program in Vasai News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News