11 December 2024 9:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

यापूर्वी ठाकरेंना कोण काय बोललं तर शिवसैनिक जाऊन चोपायचे, आताचे शेंबडे तक्रार करतात

BJP Leader Nilesh Rane, Shivsainik, Sameert Thakkar, Baby Penguin

मुंबई, १६ जुलै : ट्विटरवर #BabyPenguin हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. यामध्ये ठाकरे सरकारची थेट मुघल राजशी तुलना करणाऱ्या एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा हॅशटॅग अधिकच ट्रेंड होऊ लागला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, युवासेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी ट्विटर युजर समीत ठक्कर याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. पण यामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत का आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

विशेष म्हणजे ज्या व्यक्तीमुळे हा ट्रेंड सुरु झाला आहे त्या व्यक्तीला म्हणजे समीत ठक्करला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा फॉलो करत असल्याने युवासेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. समीत ठक्कर विरोधात व्ही पी रोड पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचं वृत्त आहे. तसेच समीत ठक्करने ट्विटमध्ये राज्यातील मोठ्या नेत्यांबद्दल अवमानकारक भाषा वापरल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. या विषयाला अनुसरून ट्विट करताना निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, “अगोदर ठाकरे कुटुंबावर कोण काय बोललं तर त्याला शोधायला शिवसैनिक जायचे आणि धरून चोपायचे पण यांचे आताचे शेंबडे शिवसैनिक तक्रार करून शांत होतात. पेंग्विन बोलला तर काय चुकलं??? पेंग्विन थंड गार हा पण थंड गार.”

 

News English Summary: The hashtag #BabyPenguin is trending on Twitter. The hashtag has become more trendy after a complaint was lodged with the Mumbai Police against a social media user who directly compared the Thackeray government to the Mughal Raj.

News English Title: BJP Leader Nilesh Rane slams Shivsainik after logging complaint against Sameert Thakkar over Baby Penguin post related to Aaditya Thackeray News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x