संजय राऊत पवार साहेबांचाच माणूस, नारायण राणेंचं टीकास्त्र

मुंबई, १६ जुलै : नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राणे म्हणाले, “सगळ्यांना माहिती आहे, करोनामुळे देशात व जगात हाहाकार झाला आहे. महाराष्ट्रात भयावह परिस्थिती आहे. करोनावर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात. याविषयी मुलाखतीत मार्गदर्शक केलं असतं, तर मी समजलं असतो की ही भीमटोला मुलाखत यशस्वी झाली. शरद पवारांवर जितकी टीका सामनातून झाली, तितकी कोणत्याही वर्तमानपत्रातून झाली नाही. शरद पवारांविषयी मला आदर आहे, पण सामनातील ही मुलाखत हेच राजकारण आहे,” अशी टीका राणे यांनी केली.
यावेळी शरद पवार यांची सामनासाठी घेण्यात आलेली मुलाखत, मराठा आरक्षण, कोरोनाचं संकट अशा मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. मुख्य म्हणजे या साऱ्यामध्ये सत्ताधाऱी आणि विशेष म्हणजे शिवसेनेच्या भूमिकेवर राणेंनी सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं.
इतर वृत्तपत्रांच्या तुलनेत सामनातूनच पवारांवर सर्वाधिक टीका करण्यात आली असल्यामुळं इथंच त्यांची मॅरेथॉन मुलाखत होणं ही बाब आश्चर्यकारक असल्याचा टोला त्यांनी लगावला. शरद पवार यांच्याबाबत आपल्या मनात आदराची भावना असल्याचं म्हणत तरीही काही गोष्टी मांडत राणेंनी विषयाला वळण दिलं.
नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
- मराठा आरक्षण – समाजाला न्याय मिळण्यासाठी सरकारने जी तयारी करायला हवी होती, मोठे वकील नेमायला हवे होते, चर्चा करायला हवी होती ते केलेलं नाहीये, तिकडे सरकारने लक्ष द्यावं.
- फक्त बाळासाहेब ठाकरे सोडा पण उद्धव ठाकरे यांनीही शरद पवारांवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी शरद पवारांची ही मॅरेथॉन टीका आहे.
- भाजप आणि फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी ही मुलाखत घेतली होती
- संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार असले तरी ते शरद पवारांचा माणूस आहे. राऊत दिल्लीत जास्त वेळ पवारांकडे असतात. पवारांचा माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे
- गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मुंबईत कोकणात जाण्यासाठी मनाई करायला माझा विरोध आहे.
News English Summary: BJP leader Narayan Rane had a few days back criticized the Chief Minister for raising the issue of government worship of Vitthal in Pandharpur. After which, once again, Rane has verbally attacked the authorities.
News English Title: BJP MP Narayan Rane targets Shivsena and Saamana Sharad Pawar interview corona Maratha reservation News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन
-
IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर वर्षभरात 23 टक्क्यांनी घसरला, पण HDFC सिक्युरिटीज ब्रोकरेज बुलिश – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50
-
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
-
TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका
-
RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
-
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' 4 योजना देत आहेत मजबूत परतावा, गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या योजना
-
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER