12 August 2020 2:25 PM
अँप डाउनलोड

अमित शाह यांचे स्वागत करण्यासाठी भाजपने सभागृहातून पळ काढला? सविस्तर

Congress Spokesperson Sachin Sawant, Union Minister Amit Shah, Devendra Fadnavis

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला काल बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागलं. त्यानुसार दुपारी २ च्या सुमारास विधानसभेत बहुमत ठराव मांडण्यास सुरुवात झाली. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील सभागृहाचं कामकाज सांभाळत होते. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होत्या.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांनी बहुमत चाचणीदरम्यान बहिष्कार टाकत सभागृहातुन बाहेर पडले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने केलेल्या बहिष्कारावर सर्वच थरातून टीका करण्यात आली. मात्र त्यावर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील वेगळाच पुरावा समोर आणत भाजपाला तोंडघशी पडण्याच्या प्रयत्न केला आहे. केंद्रीय गृहमंत्री मुंबईत येणार असल्याने भाजपने बहिष्काराचं कारण पुढे केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आज सकाळी ११ वाजता याची अधिकृत घोषणा होणार आहे. भारतीय जनता पक्षाने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने राज्यातील विधानसभा निवडणूक बिनविरोध पार पडणार हे निश्चित झालं.

याबाबत माहिती देताना, भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, काल रात्रीपासूनच सत्ताधारी पक्षाच्या सर्व नेत्यांनी आम्हाला वारंवार आवाहन केले होते की, विधानसभा अध्यक्षपद हे वादातीत असावे यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा. महाराष्ट्राची एक चांगली परंपरा आहे की अध्यक्षांचे पद हे वादात आणायचे नाही. त्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्यासाठी आम्ही आमचे उमेदवार किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला, असे पाटील यांनी सांगितले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(239)#Devendra Fadnavis(464)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x