19 August 2019 3:38 AM
अँप डाउनलोड

पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीत 'तो' निर्णय झाल्यास भाजप कार्यकर्ते गळफास लावून घेणार

पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीत तो निर्णय झाल्यास भाजप कार्यकर्ते गळफास लावून घेणार

सांगोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडणार आहे. पवार यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी बारामतीकडे वर्ग केले आहे असा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे. दरम्यान आज होणा-या मुंबई येथील बैठकीत बारामतीचे पाणी जैसे थे राहावे, असा निर्णय झाल्यास सांगोला तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते आणि तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते शिवाजी चौक सांगोला येथे गळफास लावून घेणार आहेत.

बारामतीचे जास्तीचे पाणी घेऊ देणार नसल्याचे श्रीकांतदादा देशमुख यांनी सांगितले. त्यासाठी शिवाजी चौक येथील चिंचेच्या झाडास दोर लावून फास बांधण्यात आले आहेत, जर बैठकीत निर्णय सांगोलकरांच्या विरोधात गेल्यास अनेक कार्यकर्ते भर चौकात गळफास घेणार असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या