12 December 2024 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी आणि बकरी ईद साजरा करणाऱ्यांना सुविधा

MNS Sandeep Deshpande, Ganeshotsav, Bakri Eid, Corona Crisis, MahaVikas Aghadi

मुंबई, २० जुलै : गणपतीसाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना येत असलेल्या अडचणींच्या मुद्द्यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) राज्य सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी येतात. मात्र, राज्य सरकार बकरी ईद साजरी करण्यासाठी सुविधा देत आहे, अशी घणाघाती टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपाडे यांनी केली आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळे क्वारंटाईनचे नियम लक्षात घेऊन अनेक चाकरमनी अगोदरच कोकणातील आपल्या गावी जायला निघाले आहेत. मात्र, फिजिकल डिस्टन्सिंगच्या निर्बंधांमुळे बसमधून मर्यादित संख्येनेच प्रवासी नेता येतात. त्यामुळे एसटी आणि खासगी बसच्या तिकिटांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हाच मुद्दा मनसेने आता लावून धरला आहे.

“कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवासाठी लोक जात असतात. पण त्यांना गावी जाण्यासाठी शासनाकडून कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. परराज्यांतील लोकांना पाठवण्याची व्यवस्था केली आणि ते जाऊन परत आलेदेखील,” असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. पुढे बोलताना त्यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, पण बकरी ईद साजरी करणाऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत अशी टीकाही केली आहे. राज्य सरकार काही व्यवस्था करु शकत नसेल तर आम्ही बसेसची व्यवस्था करु, सरकारने आम्हाला परवानगी द्यावी असंही ते म्हणाले आहेत.

 

News English Summary: Those who go to Konkan for Ganpati face difficulties. However, MNS general secretary Sandeep Deshpade has lashed out at the state government for facilitating the celebration of Goat Eid.

News English Title: MNS Sandeep Deshpande On Maharashtra Government Ganeshotsav Bakri Eid News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x