21 March 2023 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा SBI Bank Account Alert | एबीआय बँक ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, तुमच्या खात्यातूनही पैसे कापले गेले असतील पहा, किती रक्कम? IRCTC Railway Confirm Ticket | कन्फर्म तिकीटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास कसा करावा? अडचणीच्या वेळी हा नियम लक्षात ठेवा PPF Scheme Update | पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर, 31 मार्चला इतके वाढीव पैसे खात्यात जमा होणार
x

चाकरमानी कोकणात ज्या ठिकाणावरून येणार, त्याच ठिकाणी स्वस्त दरात कोविड चाचणी करावी

Konkani, Konkan Ganeshotsav, MP Vinayak Raut, Corona pandemic

सिंधुदुर्ग, १० जुलै : गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. कोरोना संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. गणपतीला गावी जायला मिळणार की नाही, असा प्रश्न सर्वांच्याच मनात होता. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीत उत्तर काल मिळालं.

२२ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे, त्यानिमित्ताने अनेकजण गावी जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलगीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याअनुशंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाकरमान्यांना प्रवेश देण्याबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात सर्वात मुख्य निर्णय म्हणजे इतर जिल्ह्यांतून सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेशभक्तांना ७ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास आवश्यक असून ई-पास नसल्यास वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

दरम्यान, गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. ‘एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद’ असा टोलाही यावेळी राणेंनी मुंबईत पत्रकार परिषदेत लगावला. भाजप नेते आशिष शेलार यांच्यानंतर नारायण राणे यांनीही चाकरमान्यांना कोकणात जाऊ देण्याची मागणी केली.

या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही, असे विनायक राऊत म्हणाले. कोकणातील गणेशोत्सव आणि मुंबईतला चाकरमानी याचं एक वेगळं समीकरणं आहे. मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणातील मूळगावी जातो. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शहरात गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. त्यात अधिकाऱ्यांच्या सूचनांची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली. याबाबत दखल घेत विनायक राऊत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं.

चाकरमानी आणि गणेशोत्सव हे एक समीकरण आहे. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही. तसेच जिल्हा प्रशासनाचे वृत्त हा अंतिम निर्णय नसल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली. मात्र कोकणात ज्या ठिकाणाहून चाकरमानी येणार आहेत, त्याच ठिकाणी त्यांची कोविड चाचणी माफक दरात करावी, अशी मागणी विनायक राऊत शासनाकडे करणार आहेत.

 

News English Summary: District Collector’s meeting was held on the backdrop of Ganeshotsav. A copy of the officer’s instructions went viral on social media. Taking note of this, Vinayak Raut gave an explanation on this matter.

News English Title: Konkani people allowed to visit Konkan during Ganeshotsav said MP Vinayak Raut due corona pandemic News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Vinayak Raut(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x