28 March 2024 8:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

BHR घोटाळ्यात महाजन गटाचे भवितव्य अंधारात येताच ED कारवाईला वेग? | खडसे गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत होते?

BHR Scam

मुंबई ०८ जुलै | भाजपातून बाहेर पडल्यानंतर आपल्यामागे ईडीची चौकशी लागणार हे जवळपास एकनाथराव खडसेंना माहितीच होते. गुरुवारी खडसेंना चौकशीकामी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहायचे होते तत्पूर्वी ते १० वाजता पत्रकार परिषद घेऊन संवाद साधणार होते. एकनाथराव खडसे पत्रकार परिषदेत काहीतरी बॉम्बगोळा टाकणार असल्याची चर्चा होती परंतु त्या अगोदरच प्रकृती अस्वस्थतेमुळे पत्रकार परिषद रद्द झाल्याचे कळविण्यात आले. नेमक्या रात्रभरात काय घडामोडी घडल्या की खडसेंनी पत्रकार परिषद रद्द केली मात्र ईडीच्या चौकशीला ते सामोरे जाणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील राजस्थान सध्या दररोज बदलत असून अनेक मोठ्या घडामोडी घडत आहे. काही दिवसांपूर्वी बीएचआर प्रकरणात मोठी धरपकड करण्यात आली, अनेक दिग्गज अडकले. माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय गोत्यात आले. जळगावातील अनेक दिग्गज अडचणीत येत असताना महाजन गटाचे भवितव्य अंधारात जाणार का असे वाटत असतानाच अचानक फासे उलट फिरले आणि ईडीच्या चौकशीचा ससेमिरा खडसेंच्या मागे लागला. एकनाथराव खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने चौकशीकामी ताब्यात घेतले तर खडसेंना चौकशीकामी समन्स बजावण्यात आले.

एकनाथराव खडसे गुरुवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या चौकशीसाठी जाणार होते मात्र तत्पूर्वी १० वाजता ते मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून माहिती देण्यात आली. खडसे पत्रकार परिषदेत काहीतरी गौप्यस्फोट करणार अशी चर्चा होत होती. आपल्या कुटुंबापर्यंत बाब आल्यावर आपल्याकडे असलेल्या सर्वांच्या कुंडल्या बाहेर मांडण्याची वेळ आली असल्याचे बहुदा खडसेंना जाणवले असावे म्हणूनच त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.

रात्री पत्रकार परिषदेची घोषणा झाली आणि सकाळीच पत्रकार परिषद रद्द केल्याची बातमी आली. प्रकृती अस्वस्थतेमुळे पत्रकार परिषद रद्द केल्याचे सांगण्यात येत असले तरी बहुदा त्यामागे दुसरेच कारण असल्याची चर्चा आहे. रात्रभरात केंद्र आणि राज्यस्तरावर अनेक मोठ्या घडामोडी घडल्या असाव्या त्यामुळेच पत्रकार परिषद रद्द केल्याचे बोलले जात आहे. खडसेंनी पत्रकार परिषद रद्द केली असली तरी ते ईडीच्या कार्यालयात चौकशीकामी पोहोचले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: ED action after Girish Mahajan supporters came in radar in BHR scam news updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x