5 August 2021 3:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त Special Recipe | रुचकर पनीर पराठा रेसिपी नक्की ट्राय करा उत्तर प्रदेश निवडणुक २०२२ | प्रियांका गांधी यांच्यासंबंधित 'तो' जुना सल्ला काँग्रेस आता गांभीर्याने घेणार?
x

ईडीची ही कारवाई राजकीय हेतूने | मला आणि माझ्या कुटुंबियांना छळण्याचा प्रयत्न - एकनाथ खडसे

Eknath Khadse

मुंबई ०८ जुलै | भाजपातून बाहेर पडल्यानंतर आपल्यामागे ईडीची चौकशी लागणार हे जवळपास एकनाथराव खडसेंना माहितीच होते. गुरुवारी खडसेंना चौकशीकामी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहायचे होते तत्पूर्वी ते १० वाजता पत्रकार परिषद घेऊन संवाद साधणार होते. एकनाथराव खडसे पत्रकार परिषदेत काहीतरी बॉम्बगोळा टाकणार असल्याची चर्चा होती परंतु त्या अगोदरच प्रकृती अस्वस्थतेमुळे पत्रकार परिषद रद्द झाल्याचे कळविण्यात आले. नेमक्या रात्रभरात काय घडामोडी घडल्या की खडसेंनी पत्रकार परिषद रद्द केली मात्र ईडीच्या चौकशीला ते सामोरे जाणार आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

परंतु, एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद रद्द झाल्याने ते या चौकशीला जातील की नाही? यावरुन तर्क विर्तक लावले जात होते. परंतु, एकनाथ खडसे हे ठरलेल्या वेळी ईडी कार्यालयात हजर झाले असून ईडीचे ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. खडसे यांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ही कारवाई राजकीय सुडापोटी: खडसे
मी जेंव्हापासून भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो तेंव्हापासून माझ्या चौकश्या सुरु झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात येत असून हे मला आणि माझ्या परिवारला छळण्यासाठीचे षडयंत्र असल्याचे ते म्हणाले. मी ईडीला या चौकशीत पूर्णपणे सहकार्य करीत असून मी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP leader Eknath Khadse made serous allegation over ED enquiry news updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x