27 May 2024 12:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 27 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 27 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budhaditya Rajyog 2024 | बुधादित्य राजयोग, 3 राशींचे नशीब चमकणार, पैसा संपत्तीसाठी अत्यंत शुभं काळ ठरणार SBI Mutual Fund | नोकरदारांनो! 'या' 5 म्युच्युअल फंड योजनेतील बचत 1 कोटी पर्यंत परतावा देईल, नोट करा Railway Confirm Ticket | कन्फर्म रेल्वे तिकीट दुसऱ्याची आणि प्रवास तुमचा, नेमकं काय होईल? काय करावं लक्षात ठेवा Bank Account Alert | पगारदारांनो! पैशासंबंधित 'या' 5 गोष्टी करत असाल तर सावधान, मोठा आर्थिक फटका बसेल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव 2186 रुपयांनी धडाम झाला, पटापट शहरातील नवे दर तपासून घ्या
x

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव | शरद पवार यांचे 1 मार्चपर्यंत सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द

NCP President Sharad Pawar, Cancelled all programs, Corona pandemic

मुंबई, २२ फेब्रुवारी: राज्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.

शिवजयंतीदिनी (19 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि खान्देशातील राष्ट्रवादीचे बडे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधीदेखील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

यातच राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे, हे सर्व नेते एकमेकांच्या संपर्कात आले होते, रविवारीच मंत्री यांनी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नसमारंभात उपस्थिती लावली होती, या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हजेरी लावली होती.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार यांनी 1 मार्चपर्यंत आपले सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शरद पवारांनी हा निर्णय घेतला आहे.

 

News English Summary: NCP President Sharad Pawar has canceled all his next programs. Sharad Pawar has canceled all his public events till March 1. Sharad Pawar has taken this decision in view of the increasing prevalence of corona.

News English Title: NCP President Sharad Pawar has Cancelled all his next programs over increasing prevalence of corona news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x