19 October 2021 7:08 AM
अँप डाउनलोड

पेट्रोल-डिझेल, महागाई उच्चांकावर | ज्या मुद्यावर मोदी सत्तेत त्याच मुद्यावर आज दुर्लक्ष | जनता हतबल

Petrol Diesel and inflation

मुंबई, १६ जून | मोदी सरकारच्या काळात महागाई आणि पेट्रोल-डिझेलचे भाव उच्चांकी दरावर पाहोचले आहेत. इंधनाचे भाव प्रचंड वाढत असल्याने परिणामी महागाई देखील प्रचंड वाढत असल्याने सामान्य जनता हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतंय.

BhagyaVivah Marathi Matrimonial

विशेष म्हणजे महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमती याच विषयावर रान पेटवत मोदी सत्तेत विराजमान झाले होते. मात्र आज सामान्य जनता हवालदिल झालेली असताना पंतप्रधान मोदी याविषयावर भाष्य देखील करत नाहीत हे विशेष म्हणावं लागेल. कारण, आज देशामध्ये पुन्हा एकदा इंधनाचे दर वाढल्याने मुंबईत पेट्रोलची किंमत १०२ रुपये प्रति लिटरपेक्षाही अधिक झालीय. बुधवारी म्हणजेच १६ जून २०२१ रोजी इंडियन ऑइल कॉर्परेशनने पेट्रोलचे दर प्रति लिटरमागे २५ पैशांनी तर डिझेलचे दर १३ पैशांनी वाढवले आहेत. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलेचे दर ९६.४१ रुपये प्रति लिटरवरुन ९६.६६ वर पोहचले आहेत. तर दिल्लीतील डिझेलचे दर ८७.२८ रुपये प्रति लिटरवरुन ८७.४१ प्रति लिटरवर पोहचलेत. मुंबईमध्ये आज एक लिटर पेट्रोलसाठी १०२.८२ रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी ९४.८४ रुपये मोजावे लागताय.

रोज सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू केले जातात. वेगवेगळ्या राज्यांकडून आकारण्यात येणारे कर हे वेगवेगळे असल्याने देशभरामध्ये राज्यनिहाय दर बदलतात. महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचे दर १०५.१५ रुपये आणि डिझेलचे दर ९५.६३ रुपयांपर्यंत पोहचलेत. नागपूरमध्ये पेट्रोल मुंबईप्रमाणेच १०२ रुपयांहून अधिक किंमतीला मिळत आहे. नांदेडमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी जवळजवळ १०५ रुपये मोजावे लागत आहेत. बीड, जालना, सिंधुदुर्ग, यवतमाळमध्येही पेट्रोलचे दर १०४ रुपये प्रति लिटरपेक्षा अधिक आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Petrol Diesel and inflation rates reached on top level but still Modi govt not interested to talk on this serious issue news updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x