26 April 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला
x

प्रशांत भूषण यांनी आम्हाला दिलेला प्रतिसाद जास्त मानहानीकारक | सर्वोच्च न्यायालय

Supreme Court, Prashant Bhushan, Contempt Of Court Hearing

नवी दिल्ली, २५ ऑगस्ट : सर्वोच्च न्यायालयानं वकील प्रशांत भूषण यांना अवमानना प्रकरणात दोषी करार दिलंय. त्यांच्या शिक्षेवर येत्या २० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचं म्हटलं होतं. प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या चार माजी सरन्यायाधीशांवर कथितरित्या आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. याला ‘कंटेम्ट ऑफ कोर्ट’ (कायद्याचा अवमान) मानण्यात आलं. या प्रकरणात न्यायपालिकेनं संज्ञान घेतलं होतं. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या पीठानं या प्रकरणात भूषण यांना दोषी मानलंय.

प्रशांत भूषण यांनी सहा वर्षांतील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारेही ट्विट केले होते. हा न्यायालयाचा अवमान असून भूषण यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वकील महेश महेश्वरी यांनी केली होती. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने दोन ट्वीटबद्दल भूषण यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होतं. २२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

दरम्यान, सरन्यायाधीश शरद बोबडे आणि सुप्रीम कोर्टावर ताशेरे ओढणाऱ्या ट्विटसंबंधी माफी मागण्यास ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी नकार दिला आहे. दरम्यान सरकारची बाजू मांडणारे अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी प्रशांत भूषण यांना चेतावणी देऊन सोडलं पाहिजे असं मत सुनाणवीदरम्यान मांडलं.

“भविष्यात पुन्हा असं होता कामा नये अशी चेतावणी देऊन त्यांना सोडून द्या,” अशी विनंती त्यांनी न्यायालयाला करत कारवाई न करण्याचा आग्रह केला. मात्र सुप्रीम कोर्टाने प्रशांत भूषण यांनी आम्हाला दिलेला प्रतिसाद जास्त मानहानीकारक असल्याचं सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाकडून प्रशांत भूषण यांना न्यायालयात दाखल केलेला १०० पानी जबाब मागे घेण्याचा विचार करण्यासाठी ३० मिनिटांचा ब्रेक घेतला. प्रशांत भूषण यांनी यामध्ये माफी मागण्यास नकार दिला होता.

अॅटर्नी जनरल यांच्या सल्ल्यावर बोलताना न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी म्हटलं की, “पण प्रशांत भूषण यांना आपण काहीच चुकीचं केलेलं नाही असं वाटत आहे. त्यांनी माफीनामाही सादर केलेला नाही. लोक चुका करतात, पण त्यांना चूक केल्याचं मान्यच नाही. पण मग अशावेळी काय करावं?”.

 

News English Summary: As Attorney General KK Venugopal sought forgiveness for activist-lawyer Prashant Bhushan in the contempt of court case in Supreme Court, Justice Arun Mishra said the remarks and justification made by Bhushan “were painful”. The Supreme Court Tuesday granted 30 minutes to activist-lawyer Prashant Bhushan, convicted for contempt, to ‘think over’ his stand of not expressing regret over his tweets against the judiciary.

News English Title: Supreme Court Prashant Bhushan Contempt Of Court Hearing News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x