सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या टेस्ट मॅचचा आज पहिला दिवस आहे. दरम्यान, कांगारूंविरुद्धच्या ऐतिहासिक जेतेपदासाठी सज्ज असलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघ सुस्थितीत आला आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यात भारतीय टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फिरकीपटू रविचंद्रन आश्विन आणि वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा जखमी असले, तरी अखेरच्या सामन्यावर प्रभुत्व गाजवून मालिका ३-१ ने जिंकण्याचा भारतीय क्रिकेट संघाचा निर्धार आहे. तसेच रोहितच्या अनुपस्थितीत ऑफ फॉर्म असलेल्या लोकेश राहुल याला संघात स्थान मिळाले आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, भारतीय क्रिकेट संघाने या मालिकेत २-१ अशी आधीच आघाडी संपादन केली आहे. त्यामुळे ही मालिका खिशात घातल्यावर विराट कोहलीच्या नेतृत्वाचा आलेख अजून उंचावणार आहे.

ind vs aus 4th test match cheteshwar pujara made century and india is in good condition