13 July 2020 7:31 AM
अँप डाउनलोड

धनंजय मुंडेंचा देखील मंत्रिमंडळात समावेश निश्चित

MLA Dhananjay Mundey

मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून पाडलेली छाप आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर 30 हजारांहून अधिक मतांनी मिळविलेला विजय यामुळे धनंजय मुंडे यांना पक्षाकडून कॅबिनेट मंत्रिपद निश्‍चित झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मुंबईत आज होणाऱ्या शपथविधीसाठी परळीसह जिल्ह्यातून कार्यकर्ते रवाना झाले आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास असेल. सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार असून धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पक्षाकडून रीतसर निरोप आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. आदित्य ठाकरे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात २५ कॅबिनेट मंत्री असणार आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या मंत्र्यांचा सोमवारी दुपारी १ वाजता विधान भवनाजवळ शपथविधी होईल. कायद्यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह ४३ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ करता येते. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून अनेकांना पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. दरम्यान, विधिमंडळ परिसरातील पार्किंगच्या जागेत मुख्य स्टेज आणि त्याला लागूनच भव्य मंडप उभारण्यात आला आहे. याठिकाणी सुमारे ५०० ते ७०० आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडपामध्ये १२ पेक्षा जास्त स्क्रीन उभारण्यात आले असून विधिमंडळ परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

तत्पूर्वी मंत्रिमंडळ विस्तारावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. त्यात उपमुख्यमंत्रिपदासाठी पक्षाचे अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आणि छगन भुजबळ यांच्या नावांवर चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री केले जावे, अशी मागणी खुद्द जयंत पाटील, वळसे-पाटील आणि भुजबळ यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

त्यामुळे अजित पवार हे आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. त्यांच्याकडे “ग्राम विकास’ किंवा “अर्थ’ खात्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गृहमंत्रिपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता महाराष्ट्राला उत्सुकता आहे. पण, हे खाते कोणाला मिळणार हे विस्तारानंतरच स्पष्ट होईल, असे सूचक वक्तव्य अर्थमंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले. नव्या मंत्रिमंडळात युवा आणि अनुभवी अशा दोन्ही नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. मंत्रिमंडळामध्ये प्रादेशिक तसेच सामाजिक समतोल साधण्याचाही प्रयत्न केला जाईल, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

 

Web Title:  MLA Dhananjay Mundey may get oath for Cabinet Ministry in Maharashtra.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x