18 November 2019 12:14 AM
अँप डाउनलोड

नारायण राणे आणि अमित शहा भेट; राज्यात की दिल्लीत स्थान ?

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची दिल्लीतील ११ अकबर रोड येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी जवळपास तासभर बंद दरवाजा आड भेट झाल्याचे वृत्त आहे.

नारायण राणे यांना लवकरच होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देऊन राज्य सरकार मध्ये पाठवायचं की राज्यसभेवर घेऊन दिल्लीला पाठवायचे यावर सविस्तर चर्चा झाल्याचे कळत आहे.

नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केल्यानंतर एनडीएला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. परंतु त्यांना वारंवार केवळ मंत्रिमंडळात सामावून घेण्याची आश्वासनं दिली जात होती. त्यानंतर नारायण राणे बरेच अस्वस्थ होते आणि मला जास्त वाट बघायची सवय नाही अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली होती.

नारायण राणे यांची दिल्लीतील ११ अकबर रोड येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी जवळपास तासभर बंद दरवाजा आड भेट झाल्याचे वृत्त आहे. या भेटीदरम्यान नितेश राणे सुध्दा उपस्थित होते अशी माहिती आहे. अमित शहांच्या या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस, नारायण राणे आणि आशिष शेलार हे एकाच गाडीतून निघताना दिसले. परंतु बाहेर पडताना नारायण राणेंचे स्मित-हास्य पाहून तरी राणेंचा मार्ग मोकळा झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

पुढील महिन्यात राज्यसभा निवडणूक असून त्यात महाराष्ट्रातील एकूण सहा जागा आहेत. त्यातील ३ जागा तर भाजप सहज जिंकू शकत. त्यातून असं समजत आहे की, राणेंना कदाचित राज्या ऐवजी दिल्लीत पाठवलं जाण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(50)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या