14 November 2019 1:04 PM
अँप डाउनलोड

मी गुळगुळीत बोलत नाही! सेनेशिवाय भाजपाला राज्य करणं अशक्य: संजय राऊत

Shivsena, MP Sanjay Raut, Maharashtra Vidhansabha Election 2019, BJP Maharashtra

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत. निकालामध्ये कोणता पक्ष किती जागा मिळविणार हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. मात्र शिवसेनेने प्रत्येक जागा जिंकण्यासाठी लढली आहे. अबकी बार १०० पार हे ध्येय शिवसेनेचे होते. शिवसेना-भारतीय जनता पक्ष २०० च्या वर जाणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. शिवसेना १०० जागांवर विजयी होणार आहे. भारतीय जनता पक्षाला जास्त जागा मिळाल्या तरी शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

यासंदर्भात बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेना-भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणार हे चित्र होतं. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस, एनसीपी आणि मुख्यमंत्री म्हणतात तसे वंचित बहुजन आघाडी राहील. उद्या निकालाचं चित्र स्पष्ट होईल, वेळोवेळी पोल घेण्याची गरज नाही. महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय पर्याय नाही, आम्ही एकत्र निवडणूक लढलो तर बहुमत एकत्रच असणार असं त्यांनी सांगितले.

“एक्झिट पोल आपापल्या पद्धतीने काम करत असतात. पोल घेण्याची आम्हाला काही गरज वाटत नाही. शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या बाजूने निकाल लागणार हे स्पष्ट होतं. फक्त विऱोधी पक्ष म्हणून कोण पुढे राहिल असा प्रश्न होता,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. उद्या निकाल लागणारच आहे, मग अंदाज कशाला लावत बसायचा असं सांगताना आर आर पाटील यांनी मटका लावणं कधीच बंद केलं आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच राजकारण्यांना एखाद्या आकड्यावर टिकून राहणं शोभत नाही असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

“मी गुळगुळीत बोलत नाही. मी अनेक वर्ष शिवसेनेत आहे. शिवसेनेचं काम करत आहे. बाळासाहेबांनी जे शिकवलं आहे, त्यापलीकडे माझं पाऊल पडणार नाही. शिवसेना पुढील सत्तेतही राहील. कोणी कितीही प्रयत्न केला तरी शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणं शक्य नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्याच्या निकालानंतर शिवसेना काय आहे ते कळेल असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(62)#Shivsena(729)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या