13 August 2020 5:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
x

शिवसेना नगरसेवक गोरख जाधव यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल

Shivsena

डोंबिवली : स्वतःच्या विभागात काम सुरु ठेवण्यासाठी ठेकेदाराकडे टक्केवारीची मागणी केल्याच्या आरोपाखाली शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात शिवसेनेवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. गोरख जंगलीराम जाधव (२६) असे या त्या नगरसेवकाचे नाव असून, तो कल्याण-कसारा मार्गावरील आंबिवली रेल्वे स्टेशन नजीकच्या अटाळी गावात राहणारा आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

या परिसरातील रस्ते तसेच गटारे बांधण्याचे काम क्लासिक कंन्स्टक्शन कंपनीला देण्यात आले आहे. सदर काम सुरु करायचे आहे. परंतु या कामात कोणताही अडथळा न आणण्यासाठी स्थानिक नगरसेवक गोरख जाधव यांनी संबंधित कंपनीच्या ठेकेदाराकडे एकूण ठेक्याच्या १०% रक्कम याप्रमाणे १ लाख रुपयाची मागणी केली होती. तसेच पैसे दिल्याशिवाय काम करू नकोस,असे त्याने बजावले होते.

त्यानंतर जाधव याने सदर ठेकेदाराकडे ठरलेल्या पैशांसाठी तगादा देखील लावला होता. मात्र या जाचाला कंटाळून सदर ठेकेदाराने नवी मुंबईच्या लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी ठेकेकर आणि नगरसेवक जाधव यांच्यातील फोन संभाषणाची माहिती मिळवून खात्री केली. त्यानुसार लाचखोर गोरख जाधव याच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Shivsena(902)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x