26 September 2020 7:31 PM
अँप डाउनलोड

अमित शहांविरोधात कोणी प्रदर्शन करायचं नाही म्हणजे ते देव आहेत काय? ममता बॅनर्जी

Amit Shah, Narendra Modi, Mamta Banerjee, Loksabha Election 2019

कोलकत्ता : काल पश्चिम बंगालमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीदरम्यान टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा झाला. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यावेळी प्रसार माध्यमांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की अमित शहा म्हणजे परमेश्वर आहेत काय की त्यांच्याविरोधात कोणी प्रदर्शन देखील करू शकत नाहीत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कालच्या तुफान राड्यादरम्यान १९व्या शतकातील समाज सुधारक ईश्वरचंद विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, ते कृत्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी स्वतः उत्तर कोलकत्ता येथील विद्यासागर कॉलेजला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की अमित शहा स्वतःला काय समजतात? ते स्वतःला परमेश्वर समजतात का? त्यांच्या विरुद्ध कोणी प्रदर्शन सुद्धा करायचं नाही का? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(240)#MamtaBanerjee(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x