12 October 2024 3:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Login | पगारदारांनो, तुम्ही गरजेच्या वेळी EPF मधून पैसे काढता, नवा नियम लक्षात घ्या, होतं खूप मोठं नुकसान - Marathi News Post Office Scheme | महिलांनो पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा आणि 32,000 रुपयांपर्यंत व्याज मिळवा, जाणून घ्या योजनेविषयी Post Office Interest Rate | पोस्ट ऑफीसची खास योजना, बचतीवर व्याजानेच कमवाल 2 लाख रुपये, फायदाच फायदा - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेण्याआधी स्वतःला विचारा हे प्रश्न, नुकसान होणार नाही आणि मिळतील अनेक फायदे - Marathi News EPFO Passbook | पगारातून EPF चे पैसे कापले जातात, असा घ्या फायदा, EPF खात्यात जमा होतील 3 ते 5 करोड - Marathi News Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तन, या 6 राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरु होतोय, तुमची राशी कोणती - Marathi News Gold Rate Today | बापरे, दसऱ्याच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव वाढले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर जाणून घ्या - Marathi News
x

शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि महागाईवरून जनतेकडून मतं मिळणं अवघड, शिंदे धामिर्क मुद्यांवर केंद्रित, 9 एप्रिल अयोध्या दौरा

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde on Ayodhya Tour | देशात कोरोना संसर्गाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. विशेषतः महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 803 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे आदल्या दिवसाच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्याचवेळी, राज्यात गेल्या 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

इतक्या नवीन प्रकरणांनंतर महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा एकदा चार हजारांच्या जवळ पोहोचली आहे. महाराष्ट्रात सध्या 3,987 सक्रिय रुग्ण आहेत. याआधी बुधवारी राज्यात कोविड-19 च्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर 569 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर मंगळवारी राज्यात 711 नवीन रुग्ण आढळले होते.

एकाबाजूला कोरोनासहित शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि महागाईने सामान्य जनता होरपळत असताना राज्यातील राजकारण पुन्हा एकदा धार्मिक मुद्द्याभोवती केंद्रित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धडपडताना दिसत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि महागाई या गंभीर विषयांवर मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकार कुचकामी ठरल्याने त्यावरून मतं मिळणं अशक्य असल्याचं भाजप – शिंदे गटाला माहिती आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यापूर्वी शिवसेनेकडून एक टिझर रिलीज करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिल रोजी अयोध्येला जाणार आहेत. शिवसेना नेत्यांसह एकनाथ शिंदे अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याआधी शिवसेनेकडून एक टिझर रिलीज करण्यात आला असून, त्यात रामराज्याचा नारा देण्यात आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde on Ayodhya tour check details on 07 April 2023.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x