23 September 2021 4:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

कोरोनाचा देशात आणखी एक बळी, गुजरातमध्ये रुग्णाचा मृत्यू

News Latest Updates, Corona Crisis

अहमदाबाद, २२ मार्च: देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतो आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांनी शंभरी पार केली आहे तर मृतांचा आकडा सातच्या वर पोहोचला आहे. नुकतेच हाती आलेल्या वृत्तानुसार कोरोना व्हायरसने गुजरात राज्यात पहिला बळी घेतला आहे. सुरत येथे एका ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

गुजरातच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. कोरोनामुळे भारतामध्ये झालेला हा ७वा मृत्यू आहे. त्याआधी आज मुंबईमध्ये एका खासगी रुग्णालयात ६३ वर्षांच्या व्यक्तीने प्राण सोडले. या व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. या रुग्णाला मधूमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असे आजार होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना व्हायरस वेगाने पसरतो आहे. अवघ्या २४ तासांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुप्पट झाली होती. तसेच २२ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३२४ वर पोहोचली आहे. एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक ७४ रुग्ण आहेत.

 

News English Summery:  The number of corona virus patients is increasing day by day in the country. Corona virus patients have crossed the Shambri and the death toll has risen to seven. Corona virus is the first victim in Gujarat state according to the latest news. A 67-year-old woman has died in Surat. This woman’s report was positive. This information has been provided by the Health Department of Gujarat. This is the 7th death toll in India due to corona. Earlier today, a 63-year-old man died in a private hospital in Mumbai. This person had a Corona test positive. This patient had diabetes, high blood pressure and heart disease.

 

News English Title:  Story Corona virus 69 year old man from Gujarat died News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(213)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x