27 July 2024 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

BJP MP Kirron Kher | मला मतं देत नाहीत त्यांना चप्पलने मारलं पाहिजे, मोदी भक्त अनुपम खेर यांच्या खासदार पतीचं वक्तव्य

BJP MP Kirron Kher

BJP MP Kirron Kher | चंदीगडच्या भाजप खासदार किरण खेर यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी मला मतदान न करणाऱ्या मतदारांना चप्पलने मारलं पाहिजे असे धक्कादायक आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र खेर यांनी हे वक्तव्य कोणत्या संदर्भात केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या आम आदमी पक्ष आणि काँग्रेस कडून याला कडाडून विरोध केला जात आहे.

व्हायरल व्हिडिओनुसार खेर म्हणत आहेत, ‘डीप कॉम्प्लेक्समध्ये जर एकाही व्यक्तीने माझ्यासाठी मतदान केले नाही, तर ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. त्यांची जाऊन मन वळवायला हवी. किशनगड येथे झालेल्या पायाभरणी समारंभात भाजप खासदार बोलत होत्या. 13 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

राजकीय गदारोळ सुरू
आप’चे नेते प्रेम गर्ग म्हणाले, ‘त्यांनी दीप कॉम्प्लेक्समधील रहिवाशांशी उद्धट भाषेत संवाद साधला आहे. ते म्हणाले की, त्यांनी स्थानिक सरकारी कार्यक्रमाला भाजपचा कार्यक्रम बनवले हे अत्यंत दु:खद आहे. ‘आप’चे आणखी एक नेते प्रदीप छाबड़ा यांनी दावा केला आहे की, खेर यांनी यापूर्वी ‘आप’च्या नगरसेवकांचा उल्लेख ‘डुंगर’ असा केला होता.

किरण खेर म्हणतात की त्यांनी दीप कॉम्प्लेक्समध्ये एक कोटी रुपयांचे रस्ते बांधले आहेत, पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपल्या मतदारांशी अशी अपशब्द बोलले पाहिजेत. त्यांनी चंदीगडच्या जनतेची माफी मागावी असं स्थानिक विरोधक मागणी करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP MP and Bollywood actress Kirron Kher controversial statement over voters check details on 17 March 2023.

हॅशटॅग्स

#BJP MP Kirron Kher(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x